पंढरपूर एसटीभाडे १४१ रुपये pudhari photo
सोलापूर

Pandharpur News : पंढरपूर एसटीभाडे १४१ रुपये

तुळजापूर, अक्कलकोटसाठी ९५ रुपये तिकीट; शिवाई, शिवशाहीला नाही वाढ

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : पंढरपूर, तुळजापूर आणि अक्कलकोट या तीर्थक्षेत्री जाण्यासाठी आता एसटीबसला जादा पैसे मोजावे लागणार आहेत. पंढरपूरसाठी पूर्वीच्या १२१ वरून १४१ रुपये तिकीट दर झाले आहे. तुळजापूर आणि अक्कलकोटसाठी आता ९१ रुपये भाडे झाले आहे. एसटीने शुक्रवारच्या (दि. १७) मध्यरात्रीपासून १३.५६ टक्के तिकीट दरवाढ केल्याने हा फटका प्रवाशांना बसणार आहे.

दरम्यान, एक जमेची बाजू अशी आहे की शिवाई, शिवशाही आणि निमआराम या बसच्या तिकीट दरात वाढ झालेली नाही. यावरून महामंडळ सामान्य प्रवाशांच्या खिशातच हात घालण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे सर्वसामान्य प्रवाशांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

दरवाढ अशीही...

एसटी व्यवस्थापनाने दि. १५ मे रोजी हंगामी १० टक्के दरवाढ केली होती. ती तशीच ठेवत पुन्हा त्यात शुक्रवारी (दि. १७) ३. ५० टक्के दरवाढ केली. वाहक व प्रवाशांमधील चिल्लरचा वाद टाळण्यासाठी पाच रूपयांच्या पटीत दरवाढ केली आहे.

गळक्या, बंद पडणाऱ्या गाड्या

साध्या गाड्या पावसाळ्यात गळतात. यामुळे प्रवासी भिजतात. तर उन्हाळ्यात इंजिन तापल्याने बस रस्त्यात कुठेही बंद पडतात. याकडे लक्ष न देता केवळ साध्या बसच्या तिकीट दरात तब्बल वाढ केल्याने संताप व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT