पंढरपुरातील शिवा संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ भिंगे यांची गोळ्या घालून हत्या 
सोलापूर

Pandharpur Crime : पंढरपुरातील शिवा संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ भिंगे यांची गोळ्या घालून हत्या

पूर्ववैमनस्यातून झाल्याची प्राथमिक माहिती समोर

पुढारी वृत्तसेवा

पंढरपूर : पंढरपूर शहरातील शिवा संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ भिंगे यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इसबावी येथील त्यांच्या राहत्या घराजवळ अज्ञातांनी गोळीबार केला असून हा गोळीबार पूर्ववैमनस्यातून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, इसबावी परिसरातील त्यांच्या राहत्या घराजवळ राजाभाऊ भिंगे हे थांबले असता अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. हल्ल्यानंतर ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने शहरातील लाईफ लाईन हॉस्पिटल येथे उपचारासाठी हलवण्यात आले मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. हॉस्पीटलच्या बाहेर त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. त्यांची हत्या पूर्ववैमनस्यातून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला असून परिसरातील सीसीटिव्हीच्या माध्यमातून पोलिसांकडून आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT