Pandharpur school Holi celebration Pudhari
सोलापूर

Pandharpur school Holi celebration: शाळेत साजरी झाली केरकचऱ्याची आधुनिक होळी

प्रशांत वाघमारे या प्राथमिक शिक्षकांचा अनोखा उपक्रम

पुढारी वृत्तसेवा

पंढरपूर : जिल्हा प्राथमिक शाळा गाजरेवस्ती(शेळवे) येथे कोणताही लाकूडफाटा व गोवऱ्या न जाळता सलग 33 व्या वर्षी होळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शिक्षक वाघमारे यांनी पुढकार घेतला.

ग्राम स्वच्छतेद्वारा विद्यार्थी शिक्षक व पालकांनी केरकचरा एकत्रित गोळा केला. होळीचे विधीवत पूजन जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी संतोष बागल व सरपंच अनिल गाजरे यांनी केले. विद्यार्थिनी सानिका गाजरे, आलिशा शेख, आरोही गाजरे, श्रवण गाजरे यांनी होळी व पर्यावरणबाबत माहिती दिली. शिक्षिका जस्मिन मुलांनी यांनी आभार मानले. यावेळी संभाजी गाजरे, अरुण गाजरे, नारायण गाजरे, हरिदास गाजरे, सद्दाम शेख, विजया गाजरे, सोमा सुर्वे, सदाशिव गाजरे, बाळासाहेब गाजरे व विद्यार्थी, शिक्षक व पालक उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT