पंढरपूर : पुळुज गावातील शारदानगर येथे चारा पाण्याविना लहान गाईची एकूण 13 वासरे एका जाळीमध्ये झाडाखाली बांधलेले आढळून आली. त्यांना चारा, पाणी दिलेले नाही. ही वासरे खाटकाकडे कत्तलीसाठी देण्याच्या तयारीत होते. मात्र, पंढरपूर तालुका पोलिसांनी वेळीच छापा टाकल्याने त्यांची सुटका झाली आहे.
ही जनावरे गंगाराम साहेबराव वाघमोडे रा. पुळूज याने बांधून ठेवली होती. ती जनावरे खाटकाकडे द्यायच्या अगोदरच पोलिसांनी त्याठिकाणी छापा मारून एकूण 13 गायीच्या वासरांचे प्राण वाचवले. याबाबत गोरक्षक मानस माधव परिचारक रा. पंढरपूर यांनी पंढरपूर तालुका पोलिस ठाणे येथे गंगाराम साहेबराव वाघमोडे यांच्याविरुद्ध प्राणी संरक्षण अधिनियम व प्राण्यांना निर्दयतीने क्रूरपणे वागणूक देणे या कायद्याअंतर्गत तक्रार दिलेली आहे. त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. पोलिसांनी 13 गायीच्या लहान वासरांना ताब्यात घेऊन गोशाळेमध्ये जमा केले आहे.
ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. टी. वाय. मुजावर, पो.उपनिरीक्षक भारत भोसले, विजू गायकवाड, दीपक भोसले, सुहास देशमुख, मंगेश रोकडे, संजय गुटाळ, सागर गवळी, विजयकुमार आवटी, अभिमन्यू गरड, हसन नदाफ यांच्या पथकाने केली आहे.