Sugar Factory pudhari photo
सोलापूर

Solapur News : जिल्ह्यातील ३४ साखर कारखान्यांना गाळप परवाना

परवाना नसलेल्या कारखान्यांना ऊस पुरवठा न करण्याचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : गाळप हंगाम २०२६-२७ करिता सोलापूर जिल्ह्यातील ४० साखर कारखान्यांपैकी ३४ कारखान्यांना गाळप परवाना मंजूर झाला. ३५ कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी अर्ज केले होते. एफआरपीची रक्कम थकविल्यामुळे एका कारखान्याचा गाळप परवाना रोखण्यात आला.

सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी प्रादेशिक सहसंचालक (साखर), सोलापूर विभाग कार्यालयामार्फत पुण्यातील महाराष्ट्र राज्य साखर आयुक्तांकडे ऑनलाइन गाळप परवाना मागणी अर्ज केले होते. त्यापैकी ३४ कारखान्यांना परवाने मंजूर करण्यात आले. दरम्‍यान, गत गाळप हंगामात एफआरपीची रक्कम अदा न माढा तालुक्यातील पडसाळी येथील श्री संत कुर्मदास सहकारी साखर कारखाना आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील गोकुळ शुगर इंडस्ट्रीज लि या दोन्ही कारखान्यांना गाळप परवाने मंजूर करण्यात आले नाहीत.

‘गोकुळ’वर कारवाई करण्याची मागणी

धोत्री येथील गोकुळ साखर (सध्या ओंकार शुगर ) कारखान्‍यांने गाळप परवान्यासाठी अर्ज न करतानाच यंदाच्‍या गाळप हंगाम सुरू केले. त्‍यामुळे या कारखान्‍यांवर कारवाई करावी, असे पत्र सोलापूरच्या प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाने साखर आयुक्‍तांकडे पाठविले आहे.

परवाना नसलेल्‍या कारखान्‍यास ऊस घालू नका

गाळप परवाना नसलेल्या कारखान्यांना गाळपासाठी उस देऊ नये, असे आवाहन प्रशासनाने पुरवठादारांना केले आहे. परवाना नसलेल्या कारखान्यांना ऊस पुरवठा केल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधितांची राहील, असे आवाहन प्रादेशिक सहसंचालक (साखर) किरण गायकवाड यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT