सोलापूर

Pandharpur Borewell Accident : बोअरवेलमध्ये पडलेल्या दीड वर्षीय बालिकेचा मृत्यू

जळोलीत रात्रभर बचावकार्य; सकाळी बाहेर काढण्यात यश

पुढारी वृत्तसेवा

पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील जळोली येथे शेतातील बंद बोअरवेलमध्ये पडलेल्या दीड वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला. रात्रभर बचावकार्य करूनही पथकाला यश आले नाही.

उष्मती राहुल गावित (वय १.५ वर्षे, रा. शिसा, ता. धडगाव, जि. नंदुरबार) असे मृत बालिकेचे नाव आहे. दि. २२ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास जळोली येथील साखर कारखान्यालगत गोरख कांतिलाल नरसाळे यांच्या शेतातील बंद बोअरवेलमध्ये ऊसतोड मजुराची ही बालिका पडली. अंदाजे ४५ ते ५० फूट खोलवर बालिका अडकल्याची माहिती मिळताच प्रशासन व बचाव पथकांकडून तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगुटे, करकंब पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, बीट अंमलदार, पोलीस पाटील तसेच दोन बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. रात्रभर युद्धपातळीवर बचावकार्य सुरू होते. दि. २३ नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास बचाव पथकाला बालिकेला बोअरवेलमधून बाहेर काढण्यात यश आले. मात्र, या दुर्घटनेत बालिकेचा मृत्यू झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT