Pandharpur Vitthal Temple  Pudhari Photo
सोलापूर

Pandharpur Vitthal Mandir : तुळशी अर्चन पूजेसाठी आजपासून नोंदणी

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर; १ ते ९ जुलैमधील पूजांची होणार नोंदणी

पुढारी वृत्तसेवा

पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची तुळशी अर्चन पूजा मंदिर समितीकडून भाविकांना उपलब्ध करून देण्यात येत आहेत. दि. १ ते ९ जुलै या कालावधीतील तुळशी अर्चन पूजेची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करण्याची सुरुवात आज दि. ३० जून रोजी सकाळी ११ वा. पासून होत असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.

या पूजेसाठी २१०० रुपये देणगी मूल्य आहे. दि. १ ते ९ जुलै या कालावधीतील गर्दीचे व सण-उत्सवाचे दिवस वगळून भाविकांना पूजा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. पूजेची नोंदणी या मंदिर समितीच्या संकेतस्थळावरून करता येणार आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

भाविकांना ऑनलाईन नोंदणीसाठी अडचण आल्यास मंदिर समितीच्या नित्योपचार कार्यालयातून नोंदणी करून देण्यासह मदत व आवश्यक ते मार्गदर्शन करण्यात येणार आहे. अधिक माहिती, अटी व शर्ती मंदिर समितीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. याशिवाय अधिक माहितीसाठी मंदिर समितीशी भाविकांनी संपर्क साधावा. - प्रवीणकुमार घम, व्यवस्थापक
- प्रवीणकुमार घम, व्यवस्थापक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT