नगरसेवकाने स्वखर्चाने बुजविले खड्डे 
सोलापूर

Pandharpur News : नगरसेवकाने स्वखर्चाने बुजविले खड्डे

खड्डे बुजविण्यास नगरपालिकेचे दुर्लक्ष; तर नगरसेवक आले धावून

पुढारी वृत्तसेवा

पंढरपूर : पंढरपूर नगरपालिकेचा प्रभाग क्रमांक 8 हा अनेक छोट्या-छोट्या अरुंद बोळांचा परिसर म्हणून ओळखला जातो. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरापासून जवळ असल्यामुळे याच प्रभागात दाटीवाटीने लोकवस्ती मोठ्या प्रमाणात आहे. अनेक मठदेखील आहेत. काही बोळातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. खड्डे बुजवावेत म्हणून नगरपालिकेकडे मागणी करण्यात आली. मात्र, दखल घेतली जात नसल्याने नगरसेविका मनीषा देशपांडे यांनी स्वखर्चातून खड्डे बुजविले आहेत. यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

पडलेल्या खड्ड्यांमुळे दुचाकी चालकांना, महिलांना मोठी कसरत करावी लागत आहे. येथील खड्डे तातडीने बुजविले जावेत. यासाठी पंढरपूर नगरपालिकेच्या शिक्षण मंडळाच्या सभापती नगरसेविका मनीषा देशपांडे व युवा नेतृत्व अक्षय देशपांडे हे नगरपालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करीत आले आहेत.

परंतु येथील नागरिकांना होणारा त्रास आणि नगरपालिकेकडून वेळेत होत नसलेली उपाययोजना लक्षात घेत अक्षय देशपांडे यांनी प्रभाग क्रमांक आठमधील रस्त्यांवरील खड्डे स्वखर्चाने काँक्रीटच्या माध्यमातून बुजवून घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

खरे तर नगरपालिका निवडणुका जवळ आल्या की अनेक जण स्वखर्चाने कामे करण्यासाठी पुढे सरसावतात. परंतु निवडणुकीत मोठ्या फरकाने विजय संपादन केल्यानंतर देखील आपल्या प्रभागातील नागरिकांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी नगरसेविका मनीषा देशपांडे आणि युवा नेतृत्व अक्षय देशपांडे, डॉ. धनंजय देशपांडे हे कटिबद्ध असल्याचेच यातून दिसून येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT