सोलापूर

Pandharpur News: गोंधळ, खडाजंगी आणि विषयांना मंजुरी

पंढरपूर नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा गाजली; दिवंगत आमदारांच्या स्मारकासह सर्व विषयांना मंजुरी, कॉरिडॉरवरून खडाजंगी

पुढारी वृत्तसेवा

पंढरपूर : पंढरपूर नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा सोमवारी नगराध्यक्षा डॉ. प्रणिता भालके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सुमारे तीन तास चाललेल्या या सभेत शहराच्या विकासाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यास मंजुरी देण्यात आली. पंढरपूर कॉरिडॉरच्या मुद्दयावरुन सभेत गोंधळ उडाला. तर दिवंगत आमदारांच्या एकत्र पुतळ्यांचा विषय देखील मंजूर करण्यात आला आहे.

यावेळी उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे, ज्येष्ठ नगरसेवक नागेश भोसले, लक्ष्मण शिरसट, गटनेते वैभव बडवे, अमोल डोके, ओंकार जोशी, संजय बंदपट्टे, सुनील वाळूजकर, लखन चौगुले, अक्षय गांगेकर, बालाजी मलपे, विशाल मलपे, राहुल शिंदे, नगरसेविका प्रणिता घाडगे, माधुरी धोत्रे, उज्वला भालेराव, अनिता ढवळे, प्रिया शिंदे आदींसह सर्व नगरसेवक आणि नगरसेविका उपस्थित होते.सभेच्या सुरुवातीलाच नगरसेवक वैभव बडवे यांनी पंढरपूर मंदिर कॉरिडॉरबाबत नगरपरिषदेची भूमिका काय आहे, असा प्रश्न उपस्थित केला.

यावरून सभागृहात काही वेळ शाब्दिक चकमक उडाली. मात्र, नगराध्यक्षांनी “आजच्या विषय पत्रिकेवर हा विषय नसल्यामुळे त्यावर चर्चा होणार नाही,“ असे स्पष्ट करत पुढील विषयांना सुरुवात केली. मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचन केले.

सभेतील सर्वात महत्त्वाचा विषय पंढरपूर तालुक्यातील सर्व दिवंगत आमदारांचे शहरात एकाच ठिकाणी पुतळ्यांचे स्मारक विकसित करण्याचा होता. या विषयावर सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही बाजूंच्या नगरसेवकांनी आपली मते मांडली. अखेर, प्रदीर्घ चर्चेनंतर या स्मारकाच्या विषयाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT