सोलापूर

Pandharpur News : माघारी जातो पंढरीनाथा, आमचा रामराम घ्यावा..!

कार्तिकी यात्रा साजरी करून भाविक परतीच्या प्रवासाला

पुढारी वृत्तसेवा

पंढरपूर : कार्तिकी यात्रा एकादशीचा मुख्य सोहळा साजरा करून मनोमन विठ्ठल-रुक्मिणीचे नमन करत भाविकांनी 'द्वादशीला जातो माघारी पंढरीनाथा । तुझे दर्शन झाले आता ॥ आमचा रामराम घ्यावा,' अशी आर्त हाक देत राज्यासह परराज्यांतून आलेल्या ६ लाखाहून अधिक भाविकांनी रविवारी परतीचा प्रवास सुरू केला. एसटी बस, रेल्वे, खासगी ट्रक, टेम्पो, ट्रॅक्टर-ट्रॉली, जीप गाड्यांचा आधार भाविक घेत आहेत.

कार्तिकी यात्रेकरीता दशमी, एकादशी व द्वादशी असे तीन दिवस पंढरपूर येथे वास्तव्यास असलेल्या भाविकांनी एकादशी साजरी करून रविवारी द्वादशीला परतीचा प्रवास सुरू केला आहे. बहुतांश भाविक स्वत:च्या वाहनाने तसेच एसटी बसेस व रेल्वे प्रवास करीत असल्याचे चित्र दिसून येते.

एसटीला सवलत योजना असल्याने महिलांची गर्दी जास्त दिसून येत आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठीदेखील मोफत प्रवास योजना सुरू आहे. याचा लाभ घेतला जात आहे. परतीच्या प्रवासाला वाहने बाहेर पडत असताना रस्त्यावर गर्दी होत असून वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. यंदा दुष्काळी परिस्थिती असल्याने भाविक संख्येने कमी आले आहेत. त्यामुळे यात्रेवर दुष्काळाचे सावट दिसून येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT