Pandharpur News | वकील संघटनेकडून नामदेव पायरी येथे पेढे वाटून जल्लोष  Pudhari Photo
सोलापूर

Pandharpur News | वकील संघटनेकडून नामदेव पायरी येथे पेढे वाटून जल्लोष

कोल्हापूर उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच निर्माण झाल्यामुळे पंढरीत आनंदोत्सव

पुढारी वृत्तसेवा

पंढरपूर : कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे. यासाठी तब्बल 38 वर्षे सुरू असलेल्या लढ्यात पंढरपूर तालुक्यातील सर्व वकिलांचा सहभाग होता. आंदोलनातून वकिलांनी खंडपीठाच्या मागणीची धग कायम ठेवली होती. शुक्रवारी सर्किट बेंचबाबत अधिसूचना जाहीर होताच पंढरपुरात सर्व वकिलांनी नामदेव पायरी येथे पेढे वाटून जल्लोष करण्यात आला.

मुंबई उच्च न्यायालयात ये जा करणे वकील, पक्षकार यांच्यासाठी वेळ खाऊ आणि खर्चिक होते. यामुळे वकील, पक्षकार, पोलिस यांच्याकडून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. हे टाळण्यासाठी कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे,अशी मागणी होत होती.

याकरिता आंदोलने, मोर्चे काढण्यात आले. पंढरपूर वकील संघटनेकडून पंढरपूर ते कोल्हापूर रथ यात्रा काढण्यात आली होती. याला यश आले आहे. त्यामुळे जलदगती न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याची भावना वकिलांनी व्यक्त केल्या. पंढरपूर अधिवक्ता संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. विकास भोसले, उपाध्यक्ष अ‍ॅड. संजय व्यवहारे, सचिव अ‍ॅड. शरद पवार, अ‍ॅड. गणेश चव्हाण, सदस्य अ‍ॅड. एस. एच. गायकवाड, अ‍ॅड. वर्षा हीरणवाले, अ‍ॅड. वसंत भादुले, अ‍ॅड. अर्जुन चव्हाण, अ‍ॅड. राजेश चौगुले, अ‍ॅड. किरण घाडगे, अ‍ॅड. धनंजय पवार, अ‍ॅड. दत्तात्रय पाटील, अ‍ॅड. दादासाहेब देशमुख, अ‍ॅड. संजय रोंगे, अ‍ॅड. धनश्री घाडगे, अ‍ॅड. विनायक सरवळे, अ‍ॅड. संतोष नाईकनवरे, आदी उपस्थित होते.

कोल्हापूर येथे सर्किट बेंच सुरू झाल्याने ऐतिहासिक निर्णय झाला आहे . सध्याच्या स्थितीत पक्षकारांचे मुंबईतील हेलपाटे वाचतील. त्यांच्या वेळेची बचत होईल. प्रलंबित खटले तातडीने चालविले जाऊन तत्काळ न्याय मिळू शकेल. नवोदित वकील मंडळींसाठी कोल्हापुरातील सर्किट बेंच ही एक मोठी संधी म्हणावी लागेल. पक्षकार आणि नवोदित वकिलांसाठी हा चांगला निर्णय आहे. आपल्या पंढरपूर तालुक्यासाठी सर्वसामान्य जनतेला नागरिकांना याचा निश्चितच फायदा होणार आहे.
- अ‍ॅड. विकास भोसले, अध्यक्ष, पंढरपूर अधिवक्ता संघ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT