Pandharpur News 
सोलापूर

Pandharpur News: स्थानिक भाविकांना स्वतंत्र दर्शन रांग उभारा

नागरिकांना ताटकळत उभे राहावे लागते, शिर्डी, तुळजापूर प्रमाणे थेट दर्शन देण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

पंढरपूर : गुढीपाडवा सणानिमित्त विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी पंढरपुरातील हजारो स्थानिक भाविक आले होते. परंतू, त्यांना तासनतास ताटकळत उभे राहावे लागले. यामुळे स्थानिक भाविकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे. शिर्डी व तुळजापूर प्रमाणे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने स्थानिक नागरिकांना स्वतंत्र रांग तयार करुन दर्शनासाठी सोडावे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा महर्षी वाल्मीक संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी दिला आहे.

शिर्डी व तुळजापूर या ठिकाणी स्थानिक नागरिकांना प्राधान्य दिले जात आहे. दर्शनाला भाविकांना वेगळी रांग तयार करण्यात आली आहे. या रांगेतून भाविक दर्शनासाठी जात आहेत. यामुळे तेथील भाविकातून समाधान व्यक्त होत आहे. मात्र, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने स्थानिक नागरिकांना दर्शन घेण्यासाठी तशी व्यवस्था केलेली नाही. मंदिर समितीने पहाटे 6 वाजता व रात्री 10 वाजता स्थानिक नागरिकांनी दर्शन घ्यावे, अशी सोय केली आहे.

मात्र या दोन्ही वेळी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. यामुळे मंदिर समितीचे कर्मचारी थोड्या थोड्या अंतराने भाविकांना दर्शनासाठी सोडत आहेत. यामुळे दर्शन रांगेतील भाविकांना ताटकळत उभे राहावे लागत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT