सोलापूर

Pandharpur Sugarcane Crop Fire : बोहाळी येथे शॉर्टसर्किटने सात एकर ऊस जळून खाक

ड्रिप, पाईप व केबलसह शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; शेतकऱ्यांनी शक्कल लढवल्याने आग आटोक्यात

पुढारी वृत्तसेवा

पंढरपूर : बोहाळी येथे रविवारी (दि. ११) दुपारी १.३० वाच्या सुमारास विजेच्या तारांच्या घर्षणामुळे ठिणग्या पडून उसाला आग लागली. या आगीत तीन शेतकऱ्यांचा सुमारे सात एकर ऊस जळून खाक झाला. तसेच शेतातील ड्रिप, पाईप व केबलचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दुष्काळाच्या आगीत होरपळत असलेल्या शेतकऱ्यांचे या आगीमुळे लाखो रुपये नुकसान झाले आहे.

बोहाळी येथील शेतकरी बाळासाहेब गायकवाड यांचा ३ एकर, तर नारायण खुळे यांचा ३ एकर तसेच सत्यवान गायकवाड यांचा एक एकर असा एकूण सात एकर ऊस जळून खाक झाला आहे. या उसाबरोबर ड्रिप, पाईप व केबलसह शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आग लागल्याचे लक्षात येताच स्थानिक शेतकऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. तसेच दत्तात्रय गायकवाड यांच्या ॲपल बोरच्या बागेचे आगीमुळे नुकसान झाले आहे.

दरम्यान, शेजारील शेतकऱ्यांचा शेतीचा बांध मोठा (ताल) असल्याने ही ताल ट्रॅक्टरच्या सहाय्याने रोटर फिरविला. त्यामुळे शेजारील उसाकडे जाणारी आग आटोक्यात आली. त्यामुळे किमान १० एकर ऊस आग लागण्यापासून वाचला आहे. विजेच्या ताराच्या शॉर्टसर्किटमुळे संबंधित शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याची पाहणी संबंधित विद्युत विभागाचे अधिकारी व महसूल सहाय्यक यांनी केली आहे. तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT