Pandharpur News: आमलकी एकादशीनिमित्त पंढरीत दर्शनासाठी भाविकांची गर्दी Pudhari
सोलापूर

Pandharpur News: आमलकी एकादशीनिमित्त पंढरीत दर्शनासाठी भाविकांची गर्दी

भर उन्हातही भाविकांमध्ये विठ्ठल भक्तीची ओढ, स्नानासाठी गर्दी

पुढारी वृत्तसेवा

पंढरपूर : शुक्रवारी पुत्रदा एकादशीनिमित्त पंढरीत श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी दोन लाखाहून अधिक भाविकांनी उपस्थिती लावली. चंद्रभागा स्नान आणि श्री विठ्ठल- रुक्मिणीच्या दर्शन घेण्यासाठी भाविक पसंती देत होते. त्यामुळे आलेल्या भाविकांनी पंढरीनगरी गजबजली आहे.

दरम्यान, सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर समितीकडून देखील जास्तीत जास्त भाविकांना दर्शन मिळावे म्हणून प्रयत्न करण्यात आले. पंढरीत भाविकांची गर्दी वाढू लागल्याने चंद्रभागा वाळवंट, मंदिर परिसर, प्रदक्षिणा रोड, भक्तीमार्ग, स्टेशन रोड गजबजला आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी आलेला भाविक हा चंद्रभागा स्नानासाठी प्राधान्य देत आहे. सध्या चंद्रभागेत उजनी धरणातून सोडलेले पाणी मुबलक प्रमाणात आलेले आहे. त्यामुळे भर उन्हातही भाविक स्नानाचा आनंद लुटत आहेत.

तसेच नौकानयनाचाही आनंद लुटत आहेत. स्नानानंतर श्री विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन घेण्यासाठी गर्दी करत आहेत. यामुळे दर्शन रांग मंदिरापासून 2 किमीपर्यंत दूर गेली आहे. तीन ते चार तासांचा कालावधी दर्शनासाठी लागत आहे. तर भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता अनेक भाविक हे मुखदर्शन घेण्यास पसंती देत आहेत. त्यामुळे मुखदर्शन घेण्यासासाठी देखील स्वतंत्र रांग उभारण्यात आली आहे. मुखदर्शनासाठीही तासाभराचा कालावधी लागत असल्याचे भाविकांकडून सांगण्यात येते. प्रासादिक साहित्य खरेदीसाठीदेखील भाविक पसंती देत आहेत. यामुळे बाजारपेठेत मोठी आर्थिक उलाढाल होत आहे.

एकादशीला आलेले भाविक हे पंढरपूर येथे मठ, धर्मशाळा, भक्तनिवास व हॉटेलमध्ये वास्तव्य करत आहेत. भजन, कीर्तन व प्रवचनात भाविक दंग असल्याचे दिसून येते. भाविकांच्या वाहनांनी देखील शहरात वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. या वाहतूक कोंडीचा भाविकांसह शहरवाशीयांना सामना करावा लागला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT