पंढरपूर; पुढारी वृत्तसेवा : संपुर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेली पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध न होता केवळ 5 जागा बिनविरोध झाल्या आहेत. तर 13 जागेसाठी 29 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. यात काळे-भालके गट व आ. समाधान आवताडे समर्थकांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. तर अभिजीत पाटील गटाने 12 जागेसाठी तर 2 जागेसाठी मनसे व 2 जागेसाठी अपक्षांनी उमेदवारी अर्ज ठेवले आहेत.
पंढरपूर नगरपालिका व विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभुमीवर पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुकीकडे पाहिले जाते. म्हणूनच आ. समाधान आवताडे, कल्याणराव काळे, भगीरथ भालके, अभिजीत पाटील, मनसेचे दिलीप धोत्रे आदींच्या गटांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. सुमारे 117 अर्ज दाखल झाले. मात्र, यातून 92 अर्ज छाणणीत वैध ठरले. गुरुवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी 13 जागेसाठी 29 उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले तर परिचारक गटाच्या 5 जागा बिनविरोध झाल्या आहेत. तर आ. समाधान आवताडे पॅनेल, काळे-भालके पॅनेलने मैदानातून माघार घेतली आहे.
प्रशांत परिचारक गटाचे उमेदवार
हरिष भास्कर गायकवाड, दिलीप त्रिंबक चव्हाण, तानाजी चंद्रकांत पवार, संतोष पंढरीनाथ भिंगारे, राजु विठ्ठल गावडे, महादेव पंढरीनाथ बागल, हरिभाऊ मच्छिंद्र फुगारे, सुरेश शंकर सावंत, संजिवनी बंडु पवार, शारदा अरूण नागटिळक, महादेव सुखदेव लवटे, पंडीत मारूती शेंबडे, अभिजीत दिनकर कवडे
अभिजित पाटील गट
मधुकर हरिदास मोलाणे, सुभाष वसंतराव भोसले, राजाराम यलाप्पा भुईरकर, रामदास शामराव रोंगे, नारायण गोविंद कोरके, बाजीराव प्रभु गायकवाड, रमेश पांडुरंग पवार, संगिता रायाप्पा हळणवर, अनिता नंदकुमार बागल, अभिमान रामा जाधव, विवेक औदुंबर मांडवे, विक्रम शिवाजी आसबे,
प्रकाश पाटील गट
रूक्मिणी विठ्ठल रणदिवे
मनसे उमेदवार
अनिल अरूण बागल, शशिकांत त्रिंबक पाटील, नवनाथ पोपट रणदिवे
अपक्ष उमेदवार
रमेश पांडुरंग पवार, नवनाथ पोपट रणदिवे
बिनविरोध उमेदवार परिचारक गट
यासीन अजिज बागवान, सोमनाथ सदाशिव डोंबे, नागनाथ भिमराव मोहिते, वसंत महादेव चंदनशिवे, शिवदास वामन ताड