सोलापूर

Health Services: वैद्यकीय प्रतिपूर्तीच्या चार हजारांहून अधिक प्रकरणांना मंजुरी

१४४ अपूर्ण प्रकरणे प्रलंबित; कर्मचाऱ्यांना मिळतो वैद्यकीय उपचारावरील खर्च

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : मागील आर्थिक वर्षात शासकीय आणि निमशासकीय विभागातील चार हजार ४१२ कर्मचाऱ्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडे वैद्यकीय प्रतिपूर्तीचे प्रस्ताव दाखल केले होते. दाखल प्रस्तावापैकी चार हजार २६८ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली असून अद्याप अपूर्ण असलेले १४४ प्रकरण प्रलंबित आहेत.

वैद्यकीय खर्चापोटी प्रतिपूर्तीच्या माध्यमातून शासकीय व निमशासकीय विभागातील कर्मचाऱ्यांच्या व त्यांच्या आई-वडीलांच्या आरोग्यावरील उपचारासाठी खासगी रूग्णालयात झालेल्या खर्चाची रक्कम शासनाकडून अदा केली जाते. शहर जिल्ह्यातील शासकीय आणि निमशासकीय यासह विविध शैक्षणिक संस्थामधील कर्मचारी यांना व त्यांच्या आई-वडिलांच्या आरोग्यावरील उपचारासाठी केलेल्या खर्चाची रक्कम शासनाकडून अदा केली जाते. वैद्यकीय प्रतिपूर्तीपोटी रक्कम मिळवण्यासाठी शहर व जिल्ह्यातील चार हजार ४१२ कर्मचाऱ्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडे प्रस्ताव दाखल केले होते.

या प्रस्तावातील वैद्यकीय उपचार व आरोग्य संस्थाकडे भरलेल्या रकमेची या कार्यालयाकडून तपासणी केली जाते. तपासणीनंतर या कर्मचाऱ्यांना प्रतिपूर्तीची रक्कम मिळण्यासाठी संबंधित विभागाकडे तो प्रस्ताव पाठवला जातो. त्यानंतर या कर्मचाऱ्यांना प्रतिपूर्तीची रक्कम संबंधित कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केली जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT