सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या 21 व्या दीक्षांत समारंभात महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विद्यार्थ्यांना ज्ञानाचा उपयोग राष्ट्राच्या वैभवासाठी करण्याचे आवाहन केले. ज्ञान ही सर्वात मोठी संपत्ती असल्याचे ते म्हणाले. दि. 18 रोजी दीक्षांत समारंभ विद्यापीठाच्या मैदानात उत्साहात पार पडला. यावेळी 11 हजार विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली.
या कार्यक्रमाला कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर अध्यक्षस्थानी होते. तसेच गोवा उच्च शिक्षण परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. गोपाल मुगेराया यांचीही प्रमुख उपस्थिती होती. समारंभाची सुरुवात दीक्षांत मिरवणुकीने झाली. यात परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. श्रीकांत अंधारे यांच्यासह विविध विद्याशाखेचे सदस्य आणि मोठ्या संख्येने पदवीधारक विद्यार्थी सहभागी झाले होते. या कार्यक्रमास आ. श्रीकांत भारतीय, भाजप शहर अध्यष प्रा. रोहिणी तडवळकर, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजाभाऊ सरवदे, प्रा. देवानंद चिलवंत, प्रा. सचिन गायकवाड, माजी कुलगुरू इरेश स्वामी, यांच्यासह अधिकारी कर्मचारी विद्यार्थी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. यशपाल खेडकर व डॉ. तेजस्विनी कांबळे यांनी केले.
नोकरी मागणारे नव्हे, तर देणारे व्हा : डॉ. मुगेराया
शिक्षण हे जीवन बदलून टाकते. त्यातूनच प्रगती साधता येते, असे गोवा उच्च शिक्षण परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. गोपाल मुगेराया म्हणाले. त्यांनी विद्यार्थ्यांना कौशल्य व व्यावसायिक शिक्षण घेऊन नोकरी देणारे बनण्याचे आवाहन केले. देशात तब्बल 33 वर्षांनी नवीन शैक्षणिक धोरण लागू झाल्याचेही त्यांनी सांगितले
विद्यापीठाचे शिक्षण आणि सामाजिक योगदान : कुलगुरू
कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांनी सोलापूर विद्यापीठाचे योगदान सांगितले तसेच पारंपारिक शिक्षणासोबतच कौशल्य आणि व्यवसायिकभिमुख शिक्षक देऊन विद्यापीठ रोजगारक्षम पिढी तयार करत आहे. पाच लाख व्रक्ष लागवडीचा संकल्प करत सव्वा लाख व्रक्ष लावली असून समाज आणि शिक्षण क्षेत्राचे नाते दूढ करण्यासाठी काही गावे दत्तक घेतल्याचेही यावेळी सांगितले
89 संशोधकांना पीएच.डी.
या दीक्षांत समारंभात एकूण 10,955 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. यात 89 संशोधक विद्यार्थ्यांना पीएच.डी. पदवी आणि 59 विद्यार्थ्यांना सुवर्णपदके देऊन गौरवण्यात आले.