सोलापूर

Tuljapur News : भक्ती-शक्तीचा आज जागर

सोलापूरच्या काठ्या उद्या तुळजापुरात

पुढारी वृत्तसेवा

तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजा भवानी मातेच्या दरबारात कोजागरी पौर्णिमेचा सोहळा साजरा करण्यासाठी येत्या दोन दिवसांत किमान दहा लाखांहून अधिक भाविक तुळजापुरात दाखल होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत असून प्रशासनाने भाविकांच्या गर्दीचे चोख नियोजन केले असून शहरातील सर्व रस्ते भक्तांच्या गर्दीने व्यापून जाणार असल्याने कुठेही वाहतुकीची कोंडी होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे.

दरम्यान, ‘आई राजा उदो उदो...’च्या जयघोषानी परिसर दुमदुमून गेला आहे. कोजागरी पौर्णिमेसाठी यावर्षी कर्नाटक, आंध्र प्रदेश व तेलंगणा राज्यांसह सोलापूर जिल्ह्यातील लाखो भाविक तुळजाभवानी मातेच्या नगरीत अनवाणी दाखल होत आहेत. श्री तुळजाभवानी मातेची निद्रिस्त मुख्य मूर्ती सोमवारी पहाटे सिंहासनावर प्रतिष्ठापित केल्यानंतर मूर्तीला दोनवेळा पंचामृत अभिषेक पार पडल्यानंतर नित्य पूजेची घाट होईपर्यंत लाखो भाविकांना मातेच्या मुख, धर्म दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. नित्य पूजा सकाळी सहा वाजता सुरू झाल्यानंतर मूर्तीला दुसऱ्यांदा पंचामृत अभिषेक पार पडतात.

सोमवारी सकाळी ११ वाजता सोलापूर येथील शिवलाड तेली समाजाच्या दोन मानाच्या काठ्या व पालख्यांचे आगमन होणार आहे. रविवारी सायंकाळी सिंदफळ येथील ग्रामदैवत असलेल्या मुद्गलेश्वर मंदिरात काठ्या मुक्कामी असतात.

आज कोजागरी, उद्या मंदिर पौर्णिमा

यंदा दोन पौर्णिमा असल्या तरी मंदिराची पौर्णिमा सोमवारी (२६ ऑक्टोबर) साजरी होत आहे. भाविकांच्या गर्दीचा ओघ शनिवारी सायंकाळपासून सुरू होणार आहे. कोजागरी पौर्णिमेच्या निमित्ताने सोमवार आणि मंगळवारी (२६ आणि २७ ऑक्टोबर) रात्री बारा वाजता मातेचा छबिना निघाल्यानंतर भाविकांच्या गर्दीचा ओघ कमी होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT