Onion Price  Pudhari
सोलापूर

Onion Prices : कांद्याची आवक झाली दुप्पट

बाजार समितीत ३३ हजार क्विंटल कांदा; भावातही झाली वाढ

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक आठवडाभरात दुपटीहून अधिक वाढली आहे. मागील बुधवारी १३ हजार क्विंटलच्या घरात असलेली आवक या मंगळवारी थेट ३३ हजार क्विंटलच्या पुढे गेली. विशेष म्हणजे, आवक वाढूनही कांद्याच्या सरासरी दरात ३०० रुपयांची सुधारणा झाली आहे. कमाल दरही ७ हजार १०० रुपयांवरून ८ हजार रुपयांवर पोहोचल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील बुधवारी १३१ गाड्यांमधून १३ हजार १८० क्विंटल कांद्याची आवक झाली होती. या वेळी कांद्याला कमाल ७ हजार १०० रुपये, सरासरी ३ हजार रुपये, तर किमान ५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला होता. या मंगळवारी (दि.२७) कांद्याची आवक वाढून ३३६ गाड्यांपर्यंत पोहोचली. एकूण ३३ हजार ६४९ क्विंटल कांद्याचा लिलाव झाला. या लिलावात कांद्याला कमाल ८ हजार रुपये, सरासरी ३ हजार ३०० रुपये आणि किमान ५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.

दरम्यान, पाण्याची कमतरता असल्याने शेतकरी कांदा विक्रीसाठी बाजारात आणत आहेत. दुसरीकडे, बाजारात मागणी असल्याने कांद्याला चांगला दर मिळत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. बाजार समितीत आवक वाढल्याने भाव पडतील असे वाटत असतानाच आवकेसोबत दरातही सुधारणा झाल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

सणासुदीमुळे कांद्याला मागणी वाढली

सणासुदीचे दिवस असल्याने कांद्याच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात कांद्याचे दर वाढले आहेत. सोलापूर शहरात कांद्याची विक्री ५० ते ६० रुपये प्रतिकिलो दराने होत आहे. वाढत्या मागणीमुळे ग्राहकांना कांदा खरेदीसाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT