Sangola Accident
देवदर्शनावरून येत असताना अपघात pudhari news network
सोलापूर

देवदर्शनावरून येत असताना अपघात; एक ठार; तिघे जखमी

पुढारी वृत्तसेवा

सांगोला : पंढरपुरवरून देवदर्शन करून परत कारने कोल्हापूरला येत असताना कार व जीपची समोरासमोर धडक झाल्याने कारमधील कोल्हापुरच्या भाविकाचा जागीच मृत्यू झाला. तर कारमधील तिघे जखमी झाले. हा अपघात रविवारी (दि.७) दुपारी २.५० च्या सुमारास पंढरपूर- सांगोला रोडवर फॅबटेक कॉलेज समोर घडला. मुकुंद मनोहर पाटील (वय-५६ वर्षे, रा.कोल्हापूर) असे अपघातातील मृताचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मुकुंद मनोहर पाटील हे अन्य तिघांसह पंढरपूरला देवदर्शनासाठी गेले होते. देवदर्शन करून परत कोल्हापूरला येत होते. यादरम्यान सांगोला-पंढरपूर रोडवर फॅबटेक कॉलेजजवळ त्यांची कार आली असता सांगोल्याकडून पंढरपूरच्या दिशेने समोरून आलेल्या पिकअप जीपने कारला समोरून जोराची धडक दिली. या अपघातात मुकुंद मनोहर पाटील यांचा मृत्यू झाला. तर कारमधील अन्य तिघे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची फिर्याद सांगोला ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. साळे यांनी दिली असून याबाबत पुढील तपास सांगोला पोलीस करत आहेत.

SCROLL FOR NEXT