Fraud Case Pudhari
सोलापूर

Majrewadi fraud Case: व्यवहारात एक कोटीची फसवणूक

मजरेवाडीतील घटना; पैसे घेऊनही दिली नाही जमीन

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : जमिनीची खरेदी करून देतो तसेच जमिनीवर डेव्हलपमेंटसाठी खर्च करायला लावून एक कोटी दोन लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार शहरातील मजरेवाडी येथे घडला. या प्रकरणी लक्ष्मण प्रेमनाथ सिद्धूल (वय 50, रा. भद्रावती पेठ) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांत दाखल झालेल्या फिर्यादीनुसार यादव्वाबाई शंकर पसनूर, अरुणा प्रसाद गुंडेली, यादगिरी व्यंकटप्पा पिठ्ठा, निर्मला यादगिरी पिठ्ठा, आनंद शंकर पसनूर, मुरलीधर पिठ्ठा (सर्व रा. सोलापूर ) या सहा जणांविरोधात विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

लक्ष्मण सिद्धूल व त्यांचे भागीदार आनंद गोसकी यांनी संशयितांसोबत 2021 मध्ये मजरेवाडी येथील गट नं 99/12 क्षेत्र 81 आर या जमिनीचा व्यवहार केला. ही जमीन खरेदी करून देतो म्हणून त्यांनी 75 लाख 50 हजार रुपये घेतले. या जमिनीच्या शासकीय कामासाठी तसेच जमिनीवर बोअर मारणे, कंपाऊंड करणे, जमीन सपाटीकरण करणे यासाठी 27 लाख 50 हजार रुपयांचा खर्च करायला लावला. त्यानंतर करार वाढविण्यास ते टाळाटाळ करू लागले. पैसे घेऊनही खरेदी दिली नाही. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सिद्धूल यांनी विजापूर नाका पोलिसांत धाव घेतली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक तरंगे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT