कुर्डूवाडी : ओंकार शुगर म्हैसगाव तालुका माढा या ग्रुपच्या युनिट सहा नंबर मधून एकाच दिवशी आज पर्यंतच्या स्थापने पासूनच्या इतिहासात 6106 मेट्रिक टनाने गाळप करून इतिहास रचल्याची माहिती कारखान्याचे जनरल मॅनेजर सुनील बंडगर यांनी दिली.
ओंकार शुगर परिवाराचे सर्वेसर्वा बाबुराव बोत्रे पाटील यांनी म्हैसगाव येथील हे युनिट गेल्या वर्षी घेतलेले आहे यावर्षी त्यांच गाळपाच दुसरे वर्ष आहे. या चालू सीझनमध्ये कारखाना सुरुवातीला उशिरा सुरू झाला कारण याची इतर कामे बाकी होती. यामुळे सुरुवातीला या कारखान्याचे गाळप कमी झालेले आहे. सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक उच्चांकी दर याच कारखान्याने दिलेला आहे तसेच साखरी मोफत ऊस उत्पादकाला दिलेली आहे.
शुक्रवारपासून कारखान्याने गाळपात वेग पकडलेला आहे. यामुळे आजपर्यंतच्या इतिहासातील गाळपाने हा उच्चांक ओलांडलेला आहे . बोत्रे पाटील यांनी गेल्या वर्षी कारखाना घेतलेला आहे. गेल्या वर्षी याच कारखान्याने 5899 मेट्रिक टन गाळपाचा उच्चांक केला होता. शेतकऱ्यांनी कारखान्याला चांगला ऊस द्यावा. दराच्या बाबतीतही कारखाना मागे राहणार नसल्याची ग्वाही चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील यांनी दिली.