सोलापूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील परिचारिका यांच्या प्रशासकीय बदलीला संघटनेच्यावतीने विरोध करत आझाद मैदानावर विविध प्रकारचे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची दखल घेत शासनाने याला स्थगिती दिली. विनंती व तक्रारीनुसारच यापुढे बदली होणार असल्याचे शासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. या लढ्याला यश आल्याने संघटनेच्यावतीने जल्लोष करण्यात आला.
परिचारिकांची प्रशासकीय बदली झाल्यास जिल्हा बदल होतो. यामुळे, कौटुंबिक व मुलांच्या शैक्षणिक अडचणीत वाढ होते. यासह अन्य मुद्यांवरून शासनाच्या विरोधात राज्य अध्यक्षा मनीषा शिंदे, सचिव सुमित्रा तोटे, उपाध्यक्ष भीमराव चक्रे, हेमलता गजबे, अरुण कदम आदींच्या नेतृत्वाखाली लढा उभारला होता. शिवाय प्रशासकीय बदलीने कुटुंबांसमोर कशाप्रकारे अडचणी निर्माण होतात. यासह अन्य मुद्दे शासनाला संघटनेकडून पटवून देण्यात आले. याची शासनाने दखल घेतली. परिचारिकांची यापुढील काळात विनंती आणि तक्रारीनुसारच बदली होणार असल्याने संघटनेने आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी सोलापूरच्या अध्यक्षा संध्या गावडे, सचिव आशा माने, कार्याध्यक्षा अंजली पाटील, शशिकांत साळवी, विरेश महाजनी, ज्योती चावरिया, सविता राठोड, विल्यम गायकवाड, प्रिती ससाणे, संध्या जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.