सोलापूर : जिल्ह्यातील अर्धवेळ परिचारिकांना दिवाळी भत्ता आणि गणवेश मिळावे, अशी मागणी सातत्याने होत होती. त्या मागणीचा विचार करुन जिल्हा परिषदेचे सीईओ कुलदीप जंगम यांनी सन 2024-25 अर्थसंकल्पात विशेष निधी ठेवल्याने जिल्ह्यातील 400 अर्धवेळ परिचारिकांना गणवेश अन् दिवाळी भत्ता मिळणार आहे.
आरोग्य विभागाच्या मागील वर्षीच्या मूळ तरतुदीपेक्षा एक कोटी 12 लाख रुपयांची वाढ करुन पाच कोटी 10 लाख निधी तरतुद केली आहे. या निधीतून महिलांना बाळंतपणासाठी दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी आशांना किट उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच आरोग्य केंद्र स्मार्ट करण्यासाठी 50 लाखांचा निधी ठेवला आला आहे. आरोग्य विभागात नाविन्यपूर्ण योजना अंतर्गत गरोदर महिलांसाठी जनईत्री कार्ड, युनिवर्सल डिस्चार्ज कार्ड ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी 20 लाख निधीची तरतुद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र येथे वीज, पाणी इंधनासह इतर गोष्टींसाठी एक कोटी 25 लाखांचा निधीची तरतुद करण्यात आली आहे. तसेच आरोग्य केंद्रातील जैव घनकचर्याची विल्हेवाट लावण्यासाठी निधी ठेवण्यात आले आहे.
अर्धवेळ परिचर साडेतीन हजार मानधनावर काम करतात. त्यांना कोणताही इतर लाभ नाही. सीईओ कुलदीप जंगम यांने अर्धवेळ परिचर यांना दिवाळी बोगस आणि गणवेश मिळावे, यासाठी बजेट मध्ये निधीची तरतुद केली आहे. त्यामुळे अर्धवेळ परिचरामध्ये आनंदाचे वातावरण आहे.- डॉ. संतोष नवले, जिल्हा आरोग्य अधिकारी