Crime News pudhari photo
सोलापूर

Fake Disability certificate case | नाशिकचा अरुण शिंपी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळ्याचा मास्टरमाईंड

आठ जणांपैकी तिघांवर या अगोदर गुन्हे, ८ प्रमाणपत्रे दिल्याचे उघड

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर - छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातील बनावट दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळ्याचा मास्टरमाईंड नाशिक येथील सेवानिवृत्त कर्मचारी अरुण रामदास शिंपी असल्याचे समोर आले आहे. शिंपी याच्यासह तीन एजंट, एक लाभार्थी, रुग्णालयातील दोन वरिष्ठ लिपीकांना या अगोदर अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.

तत्कालिन निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सतिश भाऊराव कनाके यास ७ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी मिळाली. शासकीय रुग्णालयातील बनावट दिव्यांग प्रकरणात अधिष्ठाता डॉ. ऋत्विक जयकर यांनी फिर्याद दिली. त्यावरुन शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास सुरु केला. सहा. पोलिस निरीक्षक शैलेश खेडकर यांच्या टिमने या संपूर्ण प्रकरणाचा तात्रिक पध्दतीने तपास करुन दिव्यांग प्रमाणपत्र घेतलेल्या राजेश जाधव (रा. अहिल्यानगर) याला ताब्यात घेतले.

यातील तीन एजंट महेश बारगजे (रा. अहिल्यानगर), राजेश ढवण (रा. अहिल्यानगर), विजय गर्जे (रा. अहिल्यानगर) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी करुन या घोटाळ्यात प्रमुख सुत्रधार अरुण शिंपी (रा. नाशिक) तसेच सोलापूरच्या शासकीय रुग्णालयातील वरिष्ठ लिपीक वसीम खान (रा. मजरेवाडी, सोलापूर), सागर रजपूत (रा. नेहरु नगर, सोलापूर) यांनाही अटक केली. हे सर्वजण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यानंतर शासकीय रुग्णालयातील तत्कालिन निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश कनाके (रा. ता. किनवट, जि. नांदेड) यास अटक केली. त्याला न्यायालयाने सात ऑगस्ट पर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. गेल्या दिड वर्षात शासकीय रुग्णालयातून तीन हजार ७१४ दिव्यांग प्रमाणपत्राचे वाटप झाले असून त्यातील आठ प्रमाणपत्रे बनावट असल्याचे उघड झाले.

तीन आरोपींवर विविध प्रकारचे गुन्हे

या घोटाळ्यातील तीन आरोपींवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. राजेश ढवण याच्यावर अहिल्यानगरच्या कोतवाली पोलिस ठाण्यात २००९ साली खून व आर्म अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल आहे. महेश बारगजे याच्यावर अहिल्यानगरच्या तोफखाना, कोतवाली पोलिस ठाण्यात फसवणुकीचे तीन गुन्हे दाखल आहेत. विजय बाबासाहेब गर्जे याच्यावर पाथर्डी पोलिस ठाण्यात हत्याराने मारहाण, विनयभंग आणि लाच घेण्याचा गुन्हा दाखल आहे.

बनावट आधारकार्ड, संगणक जप्त

अहिल्यानगरच्या पाटबंधारे विभागातील लिपीक राजेश जाधव याने सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दिव्यांग प्रमाणपत्रासाठी अर्ज करताना बनावट आधारकार्ड तयार केले. ते आधार कार्ड कोठे तयार केले याचा तपास करुन तो संगणक जप्त करण्यात आला आहे तसेच ज्या संगणाकावरुन बनावट दिव्यांग प्रमाणपत्रे दिली तो संगणकही पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याचा तपास सुरु केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT