पिलीव : महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेला शेतकऱ्यांना मिळणारा नमो शेतकरी योजनेचा लाभ जानेवारी २०२५ पासून प्रलंबित आहे. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळ पडला आहे. या दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना तरी आम्ही अजिबात वाऱ्यावर सोडणार नाही, अशी घोषणा करणाऱ्या सरकारने २०२५ पासून शेतकऱ्यांना नमो किसान सन्मान योजनेचे हप्तेच दिले नाहीत.
मागील वर्षातील तीन हप्ते व या वर्षातील एक हप्ता असे एकूण चार हप्ते म्हणजेच आठ हजार रुपये थकीत आहेत. महाराष्ट्रात यंदा भिषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. सध्या दिवाळीचा सण काही दिवसांवर आला आहे. किमान दिवाळीच्या तोंडावर तरी शेतकऱ्यांना शासन नमो शेतकरी सन्मान योजनेचे हप्ते देऊन दिवाळी गोड करणार का? असा प्रश्न रणजित पाटील, पुरुषोत्तम धायगुडे, अमोल मदने-पाटील, शामराव गलांडे आदी शेतकऱ्यांमधून विचारला जात आहे.
शेतकरी सन्मान योजनेचे हप्ते दिवाळीपूर्वी द्यावेत
दुष्काळात होरफळणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने ताबडतोब नमो शेतकरी सन्मान योजनेचे हप्ते दिवाळीपूर्वी द्यावेत, अशी मागणी माळशिरस पंचायत समितीच्या उपसभापती मनीषा मदने-पाटील यांनी केली आहे.