Municipal Council and Nagar Panchayat elections
टेंभुर्णी, पुढारी वृत्तसेवा: नगर परिषद व नगर पंचायतीच्या निवडणुकाचा धुराळा सुरू झाल्याने लवकर जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर होणार असल्याने इच्छुक उमेदवार सर्कल फिरताना दिसत आहे. गावातील पारावर, हॉटेलात, फाट्यावर चहासोबत राजकीय गप्पा रंगत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे.
जिल्हा परिषदेच्या निवडणूक अगदी जवळपास डिसेंबरमध्ये होईल म्हणून टेंभुर्णी पंचक्रोशीतील तीन जिल्हा परिषद गटातील सगळेच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते एकत्रित बसून आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडून आल्या टेंभुर्णीच्या चौकातील हॉटेलामध्ये निवडणूक कशी जिंकाची अशा गप्पा करताना दिसत आहे. मतदारांशी संवाद साधताना दिसत आहे.
कधीच कुणापुढे न झुकणारा आता पक्षाच्या नेत्यांसमोर मान खाली घालून पायाला हात लावून लोटांगण घालताना दिसत आहे. तर राजकीय पुढारी छाती फुगवित कडक इस्त्रीचे खादीचे कपडे, डोळ्यावर काळा चष्म्यातून भरचौकात आलीशान गाडीतून उतरताना त्यांचा रुबाब दिसत आहे. ग्रामीण भागातील आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सामान्य माणसाला दिसत आहे.
ग्रामीण भागातील आता मात्र लक्ष लागले ते मिनी मंत्रालय जिल्हा परिषद निवडणूक केव्हा एकदाची तारीख जाहीर होते. मी कसा निवडून येतोय याकरिता सर्व जोर लावून राजकीय पक्षांचे गाव पुढारी तयारीत आहे. सगळ्याच राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये चढाओढ सुरू झाली. ती ग्रामीण मिनी मंत्रालयामध्ये जाण्याची निवडणूक आयोगाने आता फक्त तारीख जाहीर होताच एकच जल्लोष असेल अशी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
भावी उमेदवार आता गावोगावी मंदिराच्या पारावर, शेतातील बांधावर, आठवडी बाजारात मतदार जनतेच्या भेटी गाठी घेऊन लक्ष ठेवा आपण यंदा नशीब आजमवणार आहोत. सहकार्य राह द्या. हातजोडून नमस्कार केला जात आहेत. तर काही इच्छुक गावातील रस्ते पाणंद रस्ता जुन्याच कामाचे उद्घाटन आदींची नौटंकी करताना दिसत आहे.
या गोष्टीचा परिणाम
शेतकरी यांच्याकडून कर्ज माफीचे काय झाले म्हणून प्रश्न विचारला जात आहे. तर शेतीसाठी असलेल्या सिंचन विहीर मंजुरीसाठी ५० ते ६० हजार वसुलीची चर्चा व विविध योजनेत सामान्य नागरिकांना पात्र असूनसुध्दा हजारो रुपयांची खाबोगिरी केली जाते. यांचा निवडणुकीवर परिणाम होणार असल्याचे दिसून येते.