सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातून धावणारी मुंबई-हैदराबाद एक्स्प्रेसचा 'सुपरफास्ट श्रेणीमध्ये समावेश करून गाडीच्या वेळापत्रकात आणि गाडी क्रमांकामध्ये बदल करण्यात आला आहे. १ ऑक्टोबर पासून याची अंमलबजावणी होणार असल्याची माहिती वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक एल. के. रणयेवले यांनी दिली आहे.
रेल्वे प्रशासनाकडून दिलेल्या माहितीनुसार, मुंबई- हैदराबाद एक्स्प्रेसचा समावेश सुपरफास्ट श्रेणीत करण्यात आला आहे. १ ऑक्टोबरपासून सुधारित वेळानुसार ही गाडी क्र. 22731/22732 या क्रमांकाने सुपरफास्ट एक्सप्रेस म्हणून धाववणार आहे. गाडी क्र. 22731 हैदराबाद – छत्रपत्ती शिवाजी महाराज टर्मिनस सुपरफास्ट एक्सप्रेस हैदराबाद वरुन रात्री 10.35 वाजता सुटणार, तर सोलापूर स्थानकावर दुसऱ्या दिवशी सकाळी 04.50 ला पोहचणार आहे. पुढे छत्रपत्ती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई स्थानकावर दुपारी 01.05 वाजता पोहचणार. तर गाडी क्र. 22732 -छत्रपत्ती शिवाजी महाराज टर्मिनस – हैदराबाद सुपरफास्ट एक्सप्रेस छत्रपत्ती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई स्थानकावरून दुपारी 02.10 ला सुटणार. सोलापूर स्थानकावर रात्री 10.10 वाजता पोहोचणार, तर पुढे हैदराबादला दुसऱ्या दिवशी सकाळी 04.30 ला पोहचेल.
गाडीच्या वेळेत बदल केल्याने तसेच गाडीला सुपरफास्ट दर्जा दिल्याने प्रवासाचा वेग वाढून वेळेची बचत होणार असल्याने प्रवासी या गाडीला जास्तीत जास्त पसंती दर्शवतील असा विश्वास रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
हैदराबाद-मुंबई वेळापत्रक व थांबे
गाडी क्र. 22731 हैदराबाद – छत्रपत्ती शिवाजी महाराज टर्मिनस सुपरफास्ट एक्सप्रेस: हैदराबाद रात्री 10:35 वाजता सुटणार त्यानंतर बेगमपेठ, लिंगमपल्ली, विकाराबाद जं. , तंदूर, सेरम, चित्तपूर, वाडी आगमन 02.15 प्रस्थान 02.20, कालबुर्गी आगमन 02.45 प्रस्थान 02.48, दूधणी आगमन 03.33 प्रस्थान 03.35, दुसऱ्या दिवशी पहाटे सोलापूरमध्ये आगमन 04.40 प्रस्थान 04.45, कूर्डूवाडी आगमन 05.48 प्रस्थान 05.50, जेउर आगमन 06.18 प्रस्थान 06.20, दौंड आगमन 07.30 प्रस्थान 07.35, केगाव आगमन 07.58 प्रस्थान 08.00, उरळी , पुणे जं. आगमन 09.10 प्रस्थान 09.15, लोणावळा , कल्याण, दादर, छत्रपत्ती शिवाजी महाराज टर्मिनसला आगमन दुपारी 01.05 वाजता पोहचणार.
मुंबई हैदराबाद वेळापत्रक
•गाडी क्र. 22732 छत्रपत्ति शिवाजी महाराज टर्मिनस- हैदराबाद सुपरफास्ट एक्सप्रेस: छत्रपत्ति शिवाजी महाराज टर्मिनसवरुण दुपारी 02.10 वाजता सुटणार, त्यानंतर दादर, कल्याण, लोणावळा, पुणे जं., उरळी, केगाव आगमन 06.58 प्रस्थान 07.00, दौंड आगमन 7.25 प्रस्थान 07.27, जेउर आगमन 08.18.प्रस्थान 08.20, कूर्डूवाडी आगमन 08.53 प्रस्थान 08.55, सोलापूर आगमन रात्री 10.10 प्रस्थान 10.15, दूधणी आगमन 11.03 प्रस्थान 11.05, कालबुर्गी आगमन 11.50 प्रस्थान11.53, वाडी आगमन12.40 प्रस्थान12.45, चित्तपुर, सेरम, तंदूर, विकाराबाद जं., लिंगमपल्ली, बेगमपेठ, हैदराबादला दुसऱ्या दिवशी पहाटे 04.30 वाजता पोहचणार.