Vande Bharat sleeper train File Photo
सोलापूर

Mumbai Bengaluru Sleeper Vande Bharat : मुंबई-बंगळुरू स्लीपर वंदे भारत धावणार

१ नोव्हेंबरपासून सुरू होण्याचे संकेत; सोलापूरचे कनेक्टिव्हिटीकडे लक्ष

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : मुंबई व बंगळुरू या दोन महानगरांना जोडणारी स्लीपर भारत ही एक्स्प्रेस १ नोव्हेंबरपासून सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत. बंगळुरूचे खासदार पी. सी. मोहन यांनी एक्स या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरून याबाबतची माहिती शेअर केली आहे. मात्र, अद्यापही रेल्वेच्या अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे.

या नवीन स्लीपर वंदे भारत रेल्वेमुळे मुंबई व बंगळुरू दरम्यानचा लांब पल्ल्याचा प्रवास अधिक आरामदायी होण्याची अपेक्षा आहे. या सेवेचा लाभ सोलापूरच्या प्रवाशांनाही मिळू शकतो. मात्र, येथील स्थानकावर थांबा मिळणार का, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मुंबई-बंगळुरू रेल्वे हुबळी व कलबुर्गी या दोन पर्यायी मार्गांवर चालवावी, अशी मागणी हुबळी प्रवासी संघटनेने केली आहे. आठवड्यातील वेगवेगळ्या दिवशी दोन्ही मार्गांचा वापर केल्यास मध्य कर्नाटकातील प्रवाशांनाही फायदा होऊ शकतो. अंतिम मार्ग आणि वेळापत्रक जाहीर झाल्यानंतरच या रेल्वेचे सोलापूरसाठीचे महत्त्व स्पष्ट होईल.

उद्योगांना संधी

मुंबई आणि बंगळुरू ही आर्थिक व औद्योगिक केंद्रे आहेत. जलद आणि आरामदायी रेल्वेमुळे उद्योजक, नोकरदार व व्यावसायिकांचा प्रवास सुलभ होऊ शकतो. याचा फायदा व्यापारालाही होण्याची अपेक्षा आहे.

थांब्याची प्रतीक्षा

सोलापूर स्थानकावरील थांबा, मार्ग व वेळापत्रक अद्याप स्पष्ट नाही. रेल्वेच्या अधिकृत घोषणेकडे प्रवासी आणि उद्योगविश्वाचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT