सोलापूर : राज्यातील लाडक्या बहिणींसह भावांनी राखी पौर्णिंमेनिमित्त केलेल्या प्रवासामुळे 8 ते 10 असे तीन दिवसात लालपरीला 137 कोटींचे विक्रमी उत्पन्न मिळाले. यातून सुमारे एक कोटी 93 लाख नागरिकांनी एसटीने प्रवास केला आहे.
सुट्ट्यांमुळे प्रत्येक एसटी बस प्रवाशांनी भरून धावले होते. यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीमधून महामंडळाला प्रथच 137.37 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यंदाच्या वर्षातील कमी दिवसातील विक्रमी उत्पन्न ठरले आहे. एक कोटी 93 प्रवाशांपैकी 88 लाख लाडक्या बहिणींनी लाल परीतून प्रवास केला. यामुळे मोठ्या प्रमाणात लालपरीच्या तिजोरीत भर पडली आहे. वास्तविक पाहता आषाढीसह एसटीला दिवाळी सण व याच काळातील भाऊबीज या दरम्यान उत्पन्न अधिक मिळत असते. मात्र, यंदा राखीपौर्णिमा व सलग सुट्ट्या यामुळे विक्रमी उत्पन्न मिळण्यात मदत झाली आहे. गेली कित्येक वर्ष राखीपौर्णिमेच्या कालावधीत एसटीला उत्पन्न मिळत आले आहे. यंदा, मात्र राखीपौर्णिमेसह त्याच्या दुसर्या दिवशी देखील प्रवाशांची एसटीला गर्दी होती.
राखीपौर्णिमेच्या आदल्या दिवशी म्हणजेच शुक्रवार (दि. 8) रोजी 30 कोटी 06 लाखांचे उत्पन्न मिळाले. तर, राखीपौर्णिमेच्या दिवशी शनिवार (दि. 9) रोजी 34 कोटी 86 लाख आणि पौर्णिमेच्या दुसर्या दिवशी रविवार (दि. 10) रोजी 33 कोटी 36 लाख व तसेच सोमवार (दि. 11 ) रोजी शेवटच्या दिवशी 39 कोटी 9 लाख रुपये इतके विक्रमी उत्पन्न वरील चार दिवसांत एसटीला मिळाले. राखीपौर्णिमा सणाच्या निमित्ताने 8 ते 11 ऑगस्ट या असे चार दिवसात 1 कोटी 93 लाख प्रवाशांनी एसटीतून सुरक्षित प्रवास केला आहे. 88 लाख लाडक्या बहिणींनी प्रवास केला आहे. या सणानिमित्त मोठ्या प्रमाणात प्रवाशांनी दिलेल्या प्रतिसाद दिला.
केवळ चार दिवसांत एसटीच्या तिजोरीत मोठ्या रकमेची भर पडली आहे. राखी पौर्णिमेच्या नंतर सोमवार (दि. 11) या एकाच दिवशी तब्बल 39 कोटी रुपयांचे उत्पन्न महामंडळाला प्रवासी वाहतुकीतून मिळालेे. एसटीच्या सुरक्षित प्रवासावर राज्यातील प्रवाशांचा विश्वास आहे. याचे संपूर्ण श्रेय एसटी कर्मचारी व अधिकारी यांना जाते.- प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री तथा अध्यक्ष एसटी महामंडळ