Solapur Railway 
सोलापूर

Solapur Railway: सोरेगावावरून जाणार तिसरी, चौथी रेल्वे लाईन

प्रवासी गाड्यांचा खोळंबा होणार कमी; ५३० एकर जमिनीचे भूसंपादन सुरू, मालगाड्यांसाठीचा मार्ग

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : पुणे-सोलापूर-वाडी या दरम्यानच्या ३९४.११ किलोमीटर या रेल्वेमार्गावरील वाढता वाहतुकीचा ताण कमी व्हावा यासाठी शहराच्या बाहेरून सोरेगावावरून तिसरी व चौथी लाईन उभारण्यास केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने नुकतीच मंजुरी दिली आहे. नव्या मार्गासाठी सहा तालुक्यांतील जवळपास ५३० एकर जमिनीचे भूसंपादन करण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे.

शहराच्या मध्यवर्ती भागातून सध्या दोन रेल्वे मार्ग जातात. या मार्गावरून मालगाड्यांचीही वाहतूक सुरू आहे. प्रवासी गाड्यांची संख्याही वाढली आहे. त्याचा फटका प्रवासी गाड्यांना बसत होता. प्रवाशी गाड्या ह्या अनेक वेळा सिग्नलवर थांबत असत. याच गोष्टीचा विचार करून रेल्वे विभागाच्या केंद्रीय मंत्रालयाने नवीन मार्गाचा विचार केला.

या नव्या सोरेगावावरून जाणाऱ्या बाह्य रेल्वेमार्गामुळे मालगाड्या शहरात येणार नाहीत. मालगाड्यांसाठी स्वतंत्र मार्ग होणार असल्याने प्रवासी वाहतुकीच्या गाड्या वेळेवर धावतील. पर्यायाने याचा फायदा हा प्रवाशांना होणार आहे.

प्रवासी गाड्यांची वाहतूक होणार सुरूळीत

प्रस्तावित तिसरी-चौथी लाईन पुणे-दौंड-कुर्डूवाडी ते सोलापूर व पुढे कलबुर्गी-वाडी या मार्गाशी जोडली जाणार आहे. शहराच्या बाह्य भागातून कवठे, डोणगाव, भाटेवाडी, नंदूर, सोरेगाव आणि कुमठे या परिसरांतून हा मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. यामुळे येथील बाळे व टिकेकरवाडी स्थानकांवरील प्रवासी वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT