सोलापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागांतर्गत राज्यातील विविध वैद्यकीय महाविद्यालयात ३,९११ अधिपरिचारिका पदांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची २७ नोव्हेंबर अंतिम मुदत आहे.
या भरतीत महिलांसाठी सर्वाधिक ३,१३०, तर पुरुषांसाठी ७८१ पदे आहेत. राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांमधील परिचारिकांच्या रिक्त जागांवर ही भरती प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावेत. जीएनएम, बी. एस्सी. नर्सिंग किंवा पोस्ट बेसिक बी. एस्सी. नर्सिंग पदवी पूर्ण व महाराष्ट्र परिचर्या परिषदेकडे वैध नोंदणी असणे बंधनकारक आहे. इच्छुकांनी एमपीएससीच्या mpsconline.gov.in या संकेतस्थळावर अर्ज भरावा.