सोलापूर : आजची युद्धजन्य परिस्थिती बघून मला मानसिक त्रास होतो, अशी खंत भारत-पाक युद्धस्थितीवर बोलताना खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली. खा. उदयनराजे सोलापूर दौर्यावर आले होते.
स्पेन्का मिनरल वॉटर कंपनीच्या कॉर्पोरेट कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत भाष्य केले. ते म्हणाले, आज युध्दामुळे किती लोकांचा जीव जातोय आपण पाहतोय. त्यावेळी डोके काम करायचे बंद होते. बॉर्डरवर आपल्या कुटुंबातील कोण गेले तर कसे वाटते याचा विचार करा. लोक मरताना पाहून वाईट वाटते. हा वाद मिटवण्यासाठी जागतिक पातळीवर चर्चा झाली पाहिजे. त्या चर्चेला जाण्याची माझी तयारी आहे. मात्र, जगात कोणी असू द्या, थोडं शांत बसून, आत्मचिंतन करून विचार केला पाहिजे. आपण काय करतोय.? याचे उत्तर कोणीतरी दिले पाहिजे. हे छत्रपती शिवाजी महाराजांना तर अपेक्षित होते का ? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
एका कार्यक्रमात बोलताना खा. उदयनराजे भोसले म्हणाले, प्रत्येकाची एक स्टाईल असते. जशी रजनीकांतची गॉगलची स्टाईल आहे. माझा एक मित्र म्हणाला, आपली कॉलर नेहमी टाइट असली पाहिजे. तेव्हापासून मी ही कॉलर उडविण्याची स्टाईल सुरु केली. कार्यक्रमस्थळी प्रत्यक्षात त्यांनी कॉलर उडवून दाखविली.