सोलापूर

Dr. Jyoti Waghmare: खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांची सल्लागार समिती सदस्यपदी निवड

भारताच्या संसदीय कार्य मंत्रालयाने १७ ऑगस्ट रोजी जारी केलेल्या अधिसूचनेद्वारे ही नियुक्ती जाहीर

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : राज्यसभेच्या पहिल्याच अधिवेशनात आपल्या अभ्यासू आणि प्रभावी कार्याची छाप उमटविणाऱ्या शिवसेना खासदार डॉ. ज्योती नागनाथ वाघमारे यांची केंद्र सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाच्या महत्त्वपूर्ण सल्लागार समितीवर (कन्सलटेटिव्ह कमिटी) सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

भारताच्या संसदीय कार्य मंत्रालयाने १७ ऑगस्ट रोजी जारी केलेल्या अधिसूचनेद्वारे ही नियुक्ती जाहीर केली. सोलापूरच्या दृष्टीने ही अभिमानाची आणि आनंदाची बाब मानली जात आहे. या महत्त्वपूर्ण नियुक्तीचे अधिकृत पत्र उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या हस्ते डॉ. ज्योती वाघमारे यांनी स्वीकारले.

यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी डॉ. वाघमारे यांच्या कार्याचे कौतुक करत महिला व बालकांच्या सक्षमीकरणासाठी त्या राष्ट्रीय पातळीवर प्रभावी योगदान देतील, असा विश्वास व्यक्त केला.राज्यसभेवर निवड झाल्यानंतरच्या पहिल्याच अधिवेशनात डॉ. वाघमारे यांनी महिला, बालक, कामगार आणि सामाजिक प्रश्नांवर अभ्यासपूर्ण भूमिका मांडत आपल्या कार्यक्षमतेची झलक दाखवून दिली. विविध प्रश्नांचा सखोल अभ्यास करून त्या सभागृहात सातत्याने आवाज उठवत आहेत.

महिलांचे आरोग्य, सुरक्षा, सक्षमीकरण तसेच बालकांचे पोषण, शिक्षण, संरक्षण आणि सर्वांगीण विकास यांसारख्या विषयांवर केंद्र सरकारला धोरणात्मक सल्ला देण्याचे काम या समितीमार्फत केले जाते. त्यांच्या या निवडीबद्दल सोलापूरसह राज्यातील राजकीय, सामाजिक आणि विविध क्षेत्रांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT