Dhairyashil Mohite-Patil Pudhari
सोलापूर

Dhairyashil Mohite Patil: खा. मोहिते-पाटलांची उपअभियंत्यास धमकी

ऑडिओ क्‍लिप व्‍हायरल; हात पाय तोडण्यासह शिवराळ भाषा

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : माढा लोकसभा मतदार संघातील शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांनी माळशिरस पंचायत समितीतील उपअभियंता इस्‍माईल मुलाणी यांना मोबाईलवर धमकी दिल्‍याची ऑडिओ क्‍लिप शनिवारी व्‍हायरल झाली. त्यांनी उपअभियंत्‍यास शिवराळ भाषा वापरत हात पाय तोडण्याची धमकी दिली.

याविषयी खा. मोहिते-पाटील यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी ‘पुढारी’ प्रतिनिधीने त्यांना मोबाईलवर वारंवार संपर्क केला असता त्यांनी फोन स्वीकारला नाही. उप अभियंता मुलाणी यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधल्‍यानंतर शिवराजला पाठवितो, असे सांगितले. त्‍यावेळी उप अभियंता म्‍हणाले, मी सोलापुरात आहे, त्‍यावर शिवीगाळ करून उद्या नाही आला तर दाखवितो, असे संभाषण ऑडिओ क्‍लिपमध्ये आहे. ही क्लिप व्‍हायरल झाली.

उप अभियंता मुलाणींच्‍या अनेक तक्रारी

माळशिरस पंचायत समितीमधील उप अभियंता मुलाणी यांच्‍याविषयी अनेक तक्रारी असल्‍याची माहिती समोर आली आहे. मात्र, त्‍यांच्‍यावर अद्यापही कारवाई करण्यात आली नाही. त्‍यातच आता त्‍यांच्याशी खा. मोहिते पाटील यांच्याशी झालेल्या मोबाईल संभाषणाचा ऑडिओ व्‍हायरल झाल्‍याने त्‍यांच्यापुढील अडचणीत वाढ झाली आहे.

काय आहे व्‍हायरल ऑडिओ क्‍लिप

एकजण : हॅलो...खासदार धैर्यशील मोहिते-पाटील बोलणार आहेत.

खा. मोहिते पाटील : हॅलो... शिवराजला पाठवतोय तुझ्याकडं. ते सगळं तयार करायचं अन्‌ सकाळी माझ्याकडं घेऊन यायचं.

उप अभियंता मुलाणी : अहो, मी सोलापुरला

आहे.

खा. धैर्यशील : माxxxxद घेऊन यायचं समजलं ना. उद्या सकाळी. नायतर तिथं येऊन हातपाय

तोडीन. समजलं का. ये माxxxxद ऐकू येतंय का तुला.

उप अभियंता मुलाणी : भैया, मी सोलापुरला आहे.

खा. मोहिते पाटील : उद्या सकाळी म्हणतोय तुला. नाही आला तर याद राख. तुला दाखवतोच.

(फोन डिस्कनेक्ट)----

या व्‍हायरल ऑडिओ क्‍लिपची दै. ‘पुढारी’ पुष्टी करत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT