File Photo
सोलापूर

Solapur civil hospital shocking incident: पाच दिवसांच्या मुलीला सोडून आईचे पलायन

नातेवाईकांकडून बाळ सिव्हिलच्या अतिदक्षता विभागात दाखल

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्रसुतीनंतर अवघ्या पाच दिवसाच्या मुलीला सोडून आईने पलायन केल्याची धक्कादायक घटना घडली.

अक्कलकोटच्या शांती चौक येथील पाण्याच्या टाकीखाली राहून भीक मागून राहत असलेली छाया नागेश राऊळे (मुळची हुमनाबाद कर्नाटक) ही महिला आठ महिन्याची गरोदर होती. तिच्या पोटात अचानक दुखू लागले म्हणून, नातेवाईकांनी या गरोदर महिलेला येथील शासकीय रुग्णालयात गत मंगळवार (दि. 17) रोजी उपचारासासाठी दाखल केले. याच दिवशी मंगळवार रोजी सायंकाळी पाचच्या दरम्यान या गरोदर महिलेची सिझर प्रसुती झाली. यावेळी तिला मुलगी झाली आहे.

कर्नाटकातील हुमनाबाद (जि. बिदर) येथील मुळची असलेली छाया राऊळे ही महिला अक्कलकोटच्या शांती चौकातील पाण्याच्या टाकीखाली राहून दररोज भीक मागत असे. ही महिला आठ महिन्याची गरोदर होती. पोटात दुखत असल्याने शासकीय रूग्णालयात दाखल केले. या दरम्यान या महिलेची प्रसुती विभागात हलवण्यात आले. त्यानंतर येथे या महिलेची सिझर प्रसुती झाली. सिझर प्रसुत झाल्यानंतर ती महिला अचानक गायब झाली.

दरम्यान, जन्मलेली ही मुलगी रडत नव्हती. यामुळे नवजात मुलीला उपस्थित नातेवाईकांनी याच रूग्णालयातील नवजात शिशुच्या अतिदक्षता (एलआयसीयु) विभागात दाखल केले. सध्या या नवजात मुलीच्या सोबत कोणीच नातेवाईक नाहीत. आईही सोडून गेली आहे. सध्या नवजात मुलीवर येथील शासकीय रूग्णालयात नवजात स्त्री जातीच्या मुली (अर्भक) वर उपचार सुरू आहे. विभागातील स्टाफ या मुलीची काळजी घेत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT