brick kilns Pudhari
सोलापूर

Mohol news: मोहोळमधील वीटभट्टींचा प्रश्न ऐरणीवर

चौकशी करून संबंधितांवर तत्काळ कारवाईची निवेदनाद्वारे मागणी

पुढारी वृत्तसेवा

मोहोळ शहर : मोहोळ तालुक्यात विना परवाना सुरू असलेल्या वीटभट्ट्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी तातडीने कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. भ्रष्टाचार विरोधी नवनिर्माण संघाच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा रूपाली यलगम यांनी जिल्हाधिकारी व पंढरपूर प्रांताधिकारी यांना निवेदन दिले आहे.

माहितीनुसार, तालुक्यातील विविध भागात काही वीटभट्ट्या कोणतीही परवानगी न घेता सुरू आहेत. यामुळे शासनाच्या लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. याला जबाबदार संबंधित महसूल विभागाचे अधिकारी असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

संबंधित नियम व पर्यावरणीय अटींचे पालन होत आहे का, याबाबतही प्रश्न निवेदनात उपस्थित करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर, अशा बेकायदा वीटभट्ट्यांची तपासणी करून नियमांनुसार आवश्यक ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. तसेच दोषींवर कठोर कारवाई करून शासन महसूलाचे संरक्षण करावे, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, हे निवेदन जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आले असून, या प्रकरणाची दखल घेऊन ते संबंधित विभागांना निर्देश देण्यात येतील का, याकडे लक्ष लागले आहे. आवश्यक असल्यास संबंधित तहसीलदार व इतर यंत्रणांकडून तपासणी करून अहवाल सादर करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तालुक्यातील बेकायदा व्यवसायांवर नियंत्रण ठेवणे, पर्यावरणीय नियमांची अंमलबजावणी करणे आणि शासनाचा महसूल अबाधित राखणे ही प्रशासनाची जबाबदारी असते. परंतु शासनाचे अधिकारी गप्प आहेत. याबाबत लवकरात लवकर कारवाई होणे अपेक्षित आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT