सोलापूर : अल्पवयीन मातांच्या प्रकरणाने उडालेली खळबळ आता राज्यस्तरावर पोहोचली. महाराष्ट्र महिला व बाल हक्क आयोगाने या गंभीर प्रकाराची दखल घेतली आहे. गुरुवारी (दि. 23) प्रकरणाची सुनावणी आयोगासमोर होणार असून संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
महापालिकेच्या सर्वेक्षणात समोर आलेल्या 84 प्रकरणांपैकी तब्बल 34 माता अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाल्याने प्रशासनात खळबळ उडाली होती. धक्कादायक बाब म्हणजे 15 प्रकरणांची माहिती महापालिकेकडून पोलिसांना कळविण्यातच आली नाही. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या प्रकरणात महापालिकेचा थेट संबंध नाही. ज्या प्रकरणांची चौकशी केली त्या प्रकरणात अल्पवयीन नसल्याचे निष्पन्न झाले आहे. उर्वरित प्रकरणांची चौकशी सुरू आहे. आता या प्रकरणाची दखल राज्य महिला बाल हक्क आयोगाने घेतली आहे. यांच्यासमोर सुनावणीस हजर राहण्याचे पत्र प्राप्त झाले आहे.- डॉ. राखी माने, आरोग्य अधिकारी, महानगरपालिका