सोलापूर

Tukaram Munde: माढामध्ये तुकाराम मुंडेंच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक

साखर आयुक्तपदी नियुक्तीची शेतकऱ्यांची मागणी

पुढारी वृत्तसेवा

माढा : अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल व भेसळयुक्त दूध बंद करण्यासाठी त्यांनी उचललेल्या ठोस पावलांबद्दल माढा परिसरातील शेतकऱ्यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात आनंदोत्सव साजरा केला. सामाजिक कार्यकर्ते शंभू साठे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी मुंडेच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घातला.

भेसळयुक्त दुधाविरोधात कारवाई सुरू केल्याने शेतकऱ्यांच्या दुधाला चांगला भाव मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी मुंडे यांचे आभार मानले. या वेळी शेतकऱ्यांनी शासनाकडे तुकाराम मुंडे यांना आयुक्त म्हणून ३ वर्षांचा पूर्ण कार्यकाळ द्यावा, जेणेकरून संपूर्ण खाते स्वच्छ होईल, त्याचबरोबर त्यांची साखर आयुक्त या पदावरही नियुक्ती करावी. साखर आयुक्त झाल्यास कारखानदारांवर वचक बसेल, शेतकऱ्यांवरील अन्याय दूर होईल आणि १५ दिवसांत उसाचे बिल मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. सहकारी संस्था व साखर कारखान्यांमध्ये पारदर्शक कारभार सुरू होईल, असा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमाला आबा साठे, पिंटू काशीद, सचिन करळे, बालाजी खेडकर, जितू जमदाडे, संदीप साठे, गौतम शिंदे, सचिन वाघ, सुधीर वारगड, सत्तार मुलाणी, सतीश जमदाडे, काका पाटील यांच्यासह परिसरातील अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT