मोहोळ शहरातून मशाल मोर्चा काढण्यात आला Pudhari Photo
सोलापूर

पोखरापूर : अनगरच्या अप्पर तहसील कार्यालय रद्दच्या मागणीसाठी मोहोळ शहरातून मशाल मोर्चा

पुढारी वृत्तसेवा

पोखरापूर :पुढारी वृत्तसेवा

सोमवारी (दि.12) सायंकाळी मोहोळ शहरासह तालुक्यातील नागरिकांनी रस्त्यावर उतरत हातात मशाली घेऊन मोहोळ शहरातून अनगरचे अप्पर तहसील कार्यालय रद्द करण्याच्या मागणीसाठी मशाल मोर्चा काढत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

दीपक गायकवाड यांनी प्रशासनाकडे यासंदर्भात बैठक लावून देण्याची मागणी करत सदरच्या अप्पर तहसील कार्यालयाला स्थगितीचा आदेश द्यावा, आमरण उपोषणास बसलेल्या चार तरुणांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत आहे. प्रशासनाने गांभीर्याने घ्यावे अशी मागणी केली. आलेल्या अधिकाऱ्यांनी प्रशासन स्तरावर चर्चा करून सांगतो असे आंदोलकांना सांगत आमरण उपोषण सोडून इतर मार्गाने आपली मागणी प्रशासनापर्यंत मांडण्याची विनंती केली. मात्र आंदोलन अप्पर तहसील कार्यालय रद्दचा जीआर काढा या मागणीवर ठाम होते.

दरम्यान सायंकाळी आंदोलनस्थळी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, प्रांताधिकारी इतापे, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर, तहसीलदार सचिन मुळीक, पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत आदींनी भेट देत उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीचे दीपक गायकवाड, संतोष पाटील, बाळासाहेब गायकवाड, सीमाताई पाटील, विक्रम देशमुख, अशोक भोसले,सोमेश क्षीरसागर, महेश देशमुख, सुमित पवार, चंदकांत गोडसे आदींसह सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आंदोलनकर्त्यांची प्रकृती खालावली

गेल्या चार दिवसांपासून आमरण उपोषणास बसलेल्या सत्यवान देशमुख, महेश देशमुख, शिवरत्न गायकवाड व संतोष सोलनकर या चारही आंदोलकांची प्रकृती खालावली असून या चार जणांपैकी संतोष सोलनकर यांची प्रकृती जास्तच खालावल्याने त्यांना प्रथम मोहोळ येथील शासकीय रुग्णालयात व त्यानंतर सोलापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT