Women Harassment Case Pudhari
सोलापूर

Dowry harassment case: पाच लाखांसाठी विवाहितेचा छळ

नवीन घर घेण्यासाठी तुझ्या माहेरकडून पाच लाख रूपये आण, असे म्हणत मागील 2023 पासून शिवीगाळ करून वेळोवेळी मानसिक व शारीरीक त्रास देत जिवे ठार मारण्याची धमकी दिली

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : आमचा मानपान केला नाही. नवीन घर घ्यायचे असून ते घेण्यासाठी तुझ्या माहेर कडून पाच लाख रूपये आण म्हणून विवाहितेला शिवीगाळ व जिवे ठार मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी भाग्यश्री शशीकांत हिरेमठ (वय 21) ही विवाहीत तरूणी पतीसह सासऱ्याच्या विरोधात सासरकडील एसआयडीसी पोलिसात फिर्याद दिली आहे.

शहरातील जुना विडी घरकुल येथील भाग्यश्री हिरेमठ येथे राहणाऱ्या या विवाहीत तरूणीला कशातही आमचा मानपान केला नाही. नवीन घर घेण्यासाठी तुझ्या माहेरकडून पाच लाख रूपये आण, असे म्हणत मागील 2023 पासून ते आजपर्यंत शिवीगाळ करून वेळोवेळी मानसिक व शारीरीक त्रास देत जिवे ठार मारण्याची धमकी दिली. याला कंटाळून विवाहितेने याप्रकरणी एसआयडी पोलीसात काल शनिवार रोजी पती शशीकांत हिरेमठ, सासरे चिदानंद हिरेमठ यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT