मरीआई चौक रेल्वे पूल 9 डिसेंबरपासून वर्षभर बंद  (Pudhari File Photo)
सोलापूर

Solapur News | मरीआई चौक रेल्वे पूल 9 डिसेंबरपासून वर्षभर बंद

मरीआई चौक येथील रेल्वे पूल जीर्ण झाल्याने त्या जागी नवा पूल उभारण्यात येणार आहे.

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : मरीआई चौक येथील रेल्वे पूल जीर्ण झाल्याने त्या जागी नवा पूल उभारण्यात येणार आहे. यासाठी येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौक ते मरीआई चौक हा मार्ग वाहतुकीसाठी 9 डिसेंबरपासून वर्षभर बंद राहणार आहे.

नवीन पूल

उभारणी कामासाठी एक वर्षाचा कालावधी लागणार आहे. यासाठी 9 डिसेंबर 2025 पासून पुढील वर्षाच्या 8 डिसेंबर 2026 दरम्यान पूर्णपणे बंद राहणार आहे. याबाबतचा आदेश पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी जारी केला आहे. मंगळवेढा रोडकडून हैद्राबाद, तुळजापुर, विजापूर पुण्याकडे जाणारी वाहतुक नवीन विजापूर रोड ते केगाव बायपास अशी होणार आहेत.

देगाव व दमाणी नगर येथील रहिवाशी सोलापूर शहरात येण्याजाण्यासाठी जगताप हॉस्पिटल, सी.एन.एस. हॉस्पिटल, जानकर नगर, नवीन रेल्वे बोगदा अभिमानश्री नगर, अरविंदधाम वसाहत, जुना पुना नाका हा मार्ग वापरतील.

पर्यायी मार्ग असा

मरीआई चौक ते एस.टी. स्टॅन्ड ः सर्व वाहने शेटेनगर रेल्वे बोगदा, खमीतकर अपार्टमेंट, एम.एस.ई.बी. ऑफिस, निराळे वस्ती, एस.टी.स्टॅन्ड ,मरीआई चौक, शेटेनगर ते छ. शिवाजी महाराज चौक अशी जातील व येतील.

मरीआई चौक ते रेल्वे स्टेशन :

सर्व वाहने मरीआई चौकापासून नागोबा मंदिर, रामवाडी, पोलिस चौकी, रामवाडी दवाखाना, मोदी बोगदा, जांबमुनी चौक, मोदी चौकी, कुमार चौक ते रेल्वे स्टेशन अशी जातील व येतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT