Marathi Language  Pudhari
सोलापूर

Compulsory Marathi textbooks: इंग्रजीसह इतर माध्यमांच्या शाळेत आता मराठीचे धडे

मराठी पाठ्यपुस्तक अनिवार्य; पाठ्यपुस्तक मंडळाने काढले परिपत्रक, नवीन शैक्षणिक वर्षापासून नियम होणार लागू

पुढारी वृत्तसेवा
अमोल साळुंके

सोलापूर : राज्यातील इंग्रजी, हिंदी, उर्दू, तमिळसह सर्व माध्यमांच्या शाळांना मराठी पाठ्यपुस्तक अनिवार्य करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाने परिपत्रक काढले आहे. त्यामुळे नवीन शैक्षणिक वर्षापासून सर्व माध्यमांच्या शाळेत मराठीचे धडे शिकविण्यात येणार आहे.

राज्यातील सर्व माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मराठी विषयाची गोडी लागावी, यासाठी पाठ्यपुस्तक अनिवार्य केले आहे. त्यामुळे आता इतर माध्यमांच्या शाळांना मराठी विषय सक्तीने शिकवावा लागणार आहे. विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे ज्ञान मिळावे, स्थानिक संस्कृती व परंपरेची ओळख व्हावी, दैनंदिन व्यवहारात मराठीचा वापर वाढावा या उद्देशाने शासनाने हा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.

या वर्गांचा अभ्यासक्रम पुढील वर्षी बदलणार

पाचवी, सातवी, नववी आणि अकरावी वर्गाचा पुढील वर्षी म्हणजे 2027 साली अभ्यासक्रम बदलणार आहे. त्यामुळे सन 2026-27 मध्ये या वर्गाची पाठ्यपुस्तके खरेदी आवश्यकतानुसार करावी, अशा सूचना केल्या आहेत.

बालभारतीने तयार केलेली पाठ्यपुस्तके इंग्रजीसह इतर सर्व माध्यमांच्या शाळांना खूपच उपयुक्त आहेत. त्यामुळे सर्व शाळांना ही पाठ्यपुस्तके अनिवार्य करण्यात आली आहेत.
- कादर शेख, शिक्षणाधिकारी, प्राथमिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT