Devendra Fadnavis: मराठा तरुणांचे मुख्यमंत्री फडणवीसांना रक्ताने पत्र  Pudhari
सोलापूर

Devendra Fadnavis: मराठा तरुणांचे मुख्यमंत्री फडणवीसांना रक्ताने पत्र

भाजपने सोलापुरातील समाजावर मोठा अन्याय केल्याचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : महापालिकेचे महापौर सर्वसाधारणसाठी असताना ओबीसी समाजाला महापौरपदाची संधी गेली. हा मराठा समाजावर मोठा अन्याय असल्याचा आरोप सोलापुरातील भाजप पदाधिकाऱ्यांनी केला आहे. यांच्या निषेधार्थ मराठा आंदोलक तथा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राम जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना रक्ताने पत्र लिहून मराठा समाजावर झालेल्या अन्यायाचा जाहीर निषेध नोंदवला आहे.

सोलापूरच्या महापौरपदी आतापर्यंत पद्मशाली समाजाला तीनवेळा, मुस्लीम, बंजारा व लिंगायत समाजाला प्रत्येकी दोनवेळा, तर ब्राह्मण, कैकाडी व धनगर समाजाला प्रत्येकी एकदा महापौरपदाचा मान मिळाला आहे. मात्र, मराठा समाजाला गेली तीन दशके झाले महापौरपद दिले नाही.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2016 साली घेतलेल्या मराठा आरक्षणाच्या निर्णयाबद्दल तसेच 2025 मध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासाठी दिलेल्या 700 कोटी रुपयांच्या तरतुदीबद्दल राज्यात सर्वप्रथम सोलापूरमध्ये सत्कार करण्यात आला होता, याची आठवण करून देत सोलापूर महापालिकेत मराठा समाजाला डावलण्यात आल्याची खंत पत्रात व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT