Maratha reservation: जिल्ह्यातील पाच आमदारांसह दोन्ही खासदारांचा पाठिंबा file Photo
सोलापूर

Maratha reservation: जिल्ह्यातील पाच आमदारांसह दोन्ही खासदारांचा पाठिंबा

मराठा आरक्षण आंदोलन; विशेष अधिवेशनाची आ. आवताडेंची मागणी

पुढारी वृत्तसेवा

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आ. अभिजित पाटील यांनी मुंबईत मराठा समाज आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांची भेट घेत आपला पाठिंबा दिला. त्यांच्याच पक्षाचे आ. नारायण पाटील, आ. उत्तम जानकर, शेकापचे आ. डॉ. बाबासाहेब देशमुख, शिवसेना ठाकरे गटाचे आ. दिलीप सोपल या आमदारांनी आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला.

त्याबरोबरच भाजपचे आ. समाधान आवताडे यांनी मराठा आरक्षणासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलाविण्याची मागणी केली. खा. प्रणिती शिंदे, खा. धैर्यशील मोहिते-पाटील या जिल्ह्यातील दोन्ही खासदारांनीही मराठा आंदोलनास पाठिंबा जाहीर केला.

या व्यतिरिक्त इतर आमदार आणि लोकप्रतिनिधींच्या प्रतिक्रिया आलेल्या नाहीत. मराठा समाजातील सर्वपक्षीय नेत्यांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते पुरुषोत्तम बरडे, राष्ट्रवादीचे पद्माकर काळे, राजन जाधव, काँग्रेसचे विनोद भोसले, गणेश डोंगरे यांच्यासह अनेक नेत्यांनी मुंबईत जाऊन आंदोलनाला पाठिंबा दिला.

जिल्ह्यातील आ. अभिजित पाटील यांनी मुंबईत येऊन आंदोलनाला पाठिंबा दिला. त्याशिवाय अन्य कुणीही लोकप्रतिनिधी आलेले नाहीत. आरक्षणासाठी लाखो मराठे मुंबईत असताना त्यांना पाणीसुद्धा मिळू दिले नाही. याचा सकल मराठा समाजाच्या वतीने निषेध.
- माऊली पवार, समन्वयक, सकल मराठा समाज

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT