अवैध धंद्यांविरोधात करणार ‌‘बांगडी फेक‌’ आंदोलन JANARDAN DANDGE
सोलापूर

Mangalwedha Protest : अवैध धंद्यांविरोधात करणार ‌‘बांगडी फेक‌’ आंदोलन

साठे नगरच्या महिलांचा इशारा; प्रशासनाकडे महिनाभरापासून तक्रार करूनही कारवाई नाही

पुढारी वृत्तसेवा

मंगळवेढा : साठेनगर परिसरात सुरू असलेल्या अवैध दारू विक्री व जुगार अड्ड्यांविरोधात स्थानिक महिलांनी आक्रमक भूमिका घेतली. 23 मार्च रोजी तहसील व पोलिस कार्यालयावर ‌‘बांगडी फेक‌’ आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

या संदर्भात महिलांनी 14 फेब्रुवारी रोजी प्रशासनाकडे लेखी तक्रार दिली होती. मात्र, महिनाभर उलटूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने महिलांमध्ये संतापाचे वातावरण आहे. पहाटे 5 ते सकाळी 9 तसेच सायंकाळी 7 ते रात्री 12 या वेळेत उघडपणे अवैध दारू विक्री सुरू असल्याची तक्रार आहे. तसेच गल्लीबोळांत व घराघरांत जुगाराचे अड्डे सुरू असल्याने परिसरातील तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात असल्याची खंत महिलांनी व्यक्त केली.

तर 23 मार्चला तहसीलवर मोर्चा

महिनाभरापासून प्रशासनाकडे तक्रार करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. अवैध दारू विक्री व जुगार अड्ड्यांमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. प्रशासनाने तत्काळ धाडी टाकून हे धंदे बंद करावेत. अन्यथा 23 मार्च रोजी महिलांसह तहसील व पोलिस कार्यालयावर बांगडी फेक आंदोलन करून तीव्र निषेध नोंदवला जाईल, असा इशारा प्रकाश खंदारे यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT