जिजामाता महिला पतसंस्थेला ३ कोटी ४० लाखांचा नफा 
सोलापूर

Mangalwedha News : जिजामाता महिला पतसंस्थेला ३ कोटी ४० लाखांचा नफा

सर्वसाधारण सभा खेळीमेळीत; संस्थेला सलग 'अ' वर्ग : चेअरमन आशा नागणे यांची माहिती

पुढारी वृत्तसेवा

मंगळवेढा : जिजामाता महिला पतसंस्थेने सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आर्थिक वर्षात २४१ कोटी ६३ लाख रुपयांच्या ठेवींचा टप्पा गाठला आहे. संस्थेला ३ कोटी ४० लाख रुपयांचा निव्वळ नफा झाल्याची माहिती संस्थेच्या चेअरमन आशा नागणे यांनी दिली.

संस्थेची ४१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय येथे उत्साहात पार पडली. यावेळी ते बोलत होते. संस्थेचे प्र. व्यवस्थापक श्रीकांत जाधव म्हणाले की, संस्थेचे मार्गदर्शक रामकृष्ण नागणे, संचालक मंडळ यांच्या अचूक नियोजनामुळे संस्थेला चालू आर्थिक वर्षात १५ कोटी ३५ लाख इतका ढोबळ नफा झाला आहे. तरतुदी वजा जाता ३ कोटी ४० लाख इतका निव्वळ नफा झाला आहे.

संस्थेकडे सध्या ८३ कोटी ५५ लाख इतका निधी असून २४१ कोटी ६३ लाख रुपयांच्या ठेवी जमा आहेत. याशिवाय संस्थेने १६३ कोटी ६७ लाख रुपयांची सुरक्षित गुंतवणूक केली असून १५५ कोटी १७ लाख रुपयांचे कर्जवाटप केले आहे. लेखापरीक्षणात संस्थेला 'अ' ऑडिट वर्ग मिळाला आहे. याप्रसंगी इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत ७५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवलेल्या सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा संस्थेच्या वतीने गौरव करण्यात आला. सभेच्या अध्यक्ष निवडीची सूचना संचालिका रुपाली प्रकाश दत्तू यांनी मांडली, तर त्यास जयश्री मोहन मेटकरी यांनी अनुमोदन दिले. मेघा कोंडूभैरी यांनी आभार मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT