मंद्रुप (ता. दक्षिण सोलापूर) : भंडारकवठे मंद्रुप रस्त्यावरील बुजवलेले खड्डे. File Photo
सोलापूर

Solapur News | मंद्रुप ग्रामपंचायतीने बुजवले भंडारकवठे रस्त्यावरील खड्डे

परिसरातील पंधरा गावांतील नागरिकांसह वाहन चालकांतून समाधान

पुढारी वृत्तसेवा

भंडारकवठे : भंडारकवठे ते मंद्रुप (ता. दक्षिण सोलापूर) रस्त्यावर इंदिरा नगर व सुतार गल्लीजवळ जीव घेणे दोन खड्डे पडले होते. ते खड्डे सार्वजनिक बांधकाम विभाग व ग्रामपंचायतीच्या वतीनेही बरेच दिवस बुजवण्यात आले नव्हते. याविषयी दै. ‘पुढारी’तून वृत्त प्रसिद्ध करताच मंद्रुप ग्रामपंचायतीने खड्डे बुजविले. त्यामुळे वाहन चालकांतून समाधान व्यक्त होत आहे.

भंडारकवठे रस्त्यावरील इंदिरा नगर व सुतार गल्ली अशा दोन ठिकाणी जीवघेणे खड्डे पडले होते. यामुळे सतत दुचाकीसह सर्वच प्रकारच्या वहानांचे अपघात घडत होते. यातून अनेकजण जखमी झालेे आहेत. वाहनचालकांनी वारंवार पाठपुरावा करुनही खड्डे बुजविण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत होते. दै. पुढारीने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल ग्रामंपचायतीने घेतली. व दोन्ही ठिकाणचे खड्डे बुजवले. यापुढील काळात अपघाती घटना टळणार असल्याने भंडारकवठेसह विंचूर, कुसूर, तेलगाव-भीमा, सादेपूर, बाळगी, निंबर्गी यासह अन्य गावातील नागरिकांसह वाहनचालकांतून समाधान व्यक्त होत आहे.

भंडारकवठे मंद्रुप रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याचा अनेकांना त्रास होता. ते बुजवण्यात आले आहेत. या ठिकाणी वारंवार खड्डे पडू नये. याची काळजी संबंधित यंत्रणेने घ्यावी.
- श्रीदीप हसापुरे, सरपंच, निंबर्गी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT