Fraud Case File Photo
सोलापूर

Fraud Case: सायबर गुन्ह्यातून मुक्त करण्याचे आमिष दाखवून 3 लाखांची लूट

सायबर गुन्ह्यातून नाव काढून टाकण्याचे आणि मोठ्या पुढाऱ्यांशी ओळख असल्याचे आमिष दाखवून त्याला निर्जनस्थळी बोलावून सुमारे तीन लाखांचा ऐवज लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली.

पुढारी वृत्तसेवा

मंगळवेढा : कल्याणमधील कैद्याची सोलापूरच्या कारागृहात ओळख झाली. त्याचे सायबर गुन्ह्यातून नाव काढून टाकण्याचे आणि मोठ्या पुढाऱ्यांशी ओळख असल्याचे आमिष दाखवून त्याला निर्जनस्थळी बोलावून सुमारे तीन लाखांचा ऐवज लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली.

याप्रकरणी लूट झालेला फिर्यादी ग्लेन पर्सी सिक्वेरा (वय 48, रा. कल्याण) यांनी मंगळवेढा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी अजित ऊर्फ काळ्या सुरेश पवार आणि त्याच्या दोन अनोळखी साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

सिक्वेरा सायबर फ्रॉडच्या गुन्ह्यात सोलापूर जिल्हा कारागृहात होता. तिथे त्याची ओळख नंदूरच्या अजित पवारशी झाली. अजितने सिक्वेराला माझी मोठ्या लोकांशी ओळख आहे, मी तुला या गुन्ह्यातून बाहेर काढतो, असे सांगत त्याचा विश्वास संपादन केला. पुढे 9 एप्रिल 2026 रोजी, फिर्यादी सिक्वेरा हा त्याची सहकारी मनीषा हरावत हिच्यासह सोलापूर येथे आला. अजितने त्यास ब्रह्मपुरी ते मुंढेवाडी रोडवर एका निर्जनस्थळाचे लोकेशन पाठवले. सिक्वेरा आणि हरावत तिथे पोहोचले असता अजितसोबत एक अनोळखी महिला आणि एक तरुण तिथे होता. तिथे अजितच्या महिला साथीदाराने मनीषाला धमकी देत दागिने व पैसे काढून घेतले. यामध्ये रोख रक्कम, दागिन्यांसह सुमारे तीन लाखांचा ऐवज लुटला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT