माळशिरस : माळशिरस तालुक्यात यंदा समाधानकारक पाऊस झाला नसल्याने शासनाने तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. आता दुष्काळाची मदत किती व कधी मिळणार, अशी चर्चा शेतकरी वर्गात चालू झाली आहे. तालुक्यात खरीप पिकाची शेतकऱ्यांनी ९० टक्के खरीप पिकांची पेरणी केली आहे. तालुक्यात खरीप पिकांची सरासरी ९० टक्के पेरणी होऊन मका व बाजरी या पिकांची सर्वाधिक पेरणी झाली आहे.
तालुक्यात वीर भाटघर नीरा देवधर गुंजवणी या धरणातून पाण्याचे सिंचन होत असते. ज्या भागात धरणाच्या पाण्याची सिंचन होते त्या भागात खरिपाची पेर चांगली झाली आहे. त्यामुळे खरिपाची पेर झाल्यानंतर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे खरिपाची पेर एवढ्या मोठ्या प्रमाणावर झाली आहे. परंतु ज्या भागात सिंचनाचे पाणी मिळत नाही. या भागातील खरिपाची पेर मात्र वाया गेली आहे. त्यामुळे तालुक्याच्या बहुतांशी भागातील खरीप पीक वाया गेले आहे.
तालुक्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र १ लाख ६० हजार ८०२ हेक्टर असून ९१ हजार ९९५ हेक्टर लागवडीयुक्त क्षेत्र आहे. सरासरी खरीप क्षेत्र अन्नधान्य पिके १४ हजार ६५२:५ हेक्टर आहे. उस २७ हजार ७९८, रब्बी व उन्हाळी पीके सरासरी क्षेत्र ३१ हजार ९६६ हेक्टर क्षेत्र आहे. तालुक्यात जुलै महिन्यात मान्सूनच्या पावसाने हजेरी लावली. तालुक्यात सर्वसाधारणपणे ४६४ मिमी पावसाची सरासरी आहे. जुलैअखेर तालुक्यातील १० मंडलात ७५:६ टक्के सरासरीने १५२:९ मि.मी पाऊस झाला आहे. माळशिरस तालुक्यात खरीपाची ६८:८ टक्के पेरणी झाली असून अजूनही दमदार पावसाची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.
माळशिरस तालुक्यात जुलै महिन्याच्या सुरुवातीस ब-यापैकी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली. तालुक्यात खरिपाची पेर आतापर्यंत ९० टक्के झाली असली तरीज्या भागात कॅनॉलचे पाणी मिळत नाही. त्या ठिकाणी मात्र खरिपाची पेर वाया गेली आहे. शेतकऱ्यांनी खरीपाची पेरणी केल्यानंतर तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने चांगल्या पावसाची अपेक्षा शेतकरी करीत आहे. तालुक्याच्या पावसाची सरासरी ४६४ मिलिमीटर इतकी असून सरासरीपेक्षा पावसाची नोंद कमी झाली आहे.
माळशिरस तालुक्यात खरिपात मका पिकाचे सरासरी क्षेत्र ८७९६ हेक्टर असून १००९२ हेक्टर ( ११४ टक्के ) पेर झाली आहे. तर बाजरीचे सरासरी क्षेत्र ५१६७ हेक्टर असून बाजरीची पेर २६ ६ ६ हेक्टर (५१.६० टक्के), खरीप ज्वारीचे सरासरी क्षेत्र २ हेक्टर असून खरीप ज्वारीची अद्याप पेरणी झाली नाही. अन्नधान्य पेरणीत तूर पिकाचे सरासरी क्षेत्र १०७ हेक्टर असून तुरी ची ३२ हेक्टर (३० टक्के), उडीद पिकाचे सरासरी क्षेत्र ३४ हेक्टर आहे. उडिदाची पेरणी ६ हेक्टर(१८ टक्के), मूग पिकाचे सरासरी क्षेत्र ८७ हेक्टर असून १९ हेक्टर (२२ टक्के), इतर कडधान्ये ६३ हेक्टर असुन १९ हेक्टर (३०टक्के), भुईमुग ७० हेक्टर ४ हेक्टर (६ टक्के), पेरणी झाली आहे. माळशिरस तालुक्यात उसाचे क्षेत्रही मोठ्या प्रमाणात आहे.
तालुक्यात उसाची लागवड ४६६ ५ हेक्टर वर झाली आहे. तर चारा पिके २६ ७६ हेक्टरवर झाली आहेत. पावसाअभावी ऊस उत्पादनावर परिणाम होणार आहे. तर ज्या भागात पाण्याची टंचाई आहे. त्या भागातील शेतकऱ्यांनी आत्ताच जनावरांच्या चाऱ्यासाठी उसाची विक्री केली आहे. त्यामुळे सुरू होणाऱ्या गळीत हंगामात साखर कारखान्यांना उसाची कमतरता जाणवणार आहे. तालुक्याला सिंचन करणारी चारही धरणे १०० टक्के भरल्याने पुढील काळात शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.
माळशिरस तालुक्यात आज पर्यंत ४८.८ टक्के पावसाची नोंद झाली आहे. दहीगाव मंडलात सर्वात जास्त पावसाची नोंद झाली आहे. तर वेळापूर मंडळात सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यातील दहा मंडलात पडलेला पाऊस इस्लामपूर २६५.५ मिमी, माळशिरस १४३ . १ मिमी, सदाशिवनगर २०२.७ मिमी, दहिगाव ३०८.६ मिमी, नातेपुते २६६.४ मिमी, अकलूज १५२. ३ मिमी, लवंग ७४.३ मिमी, महाळुंग १७१ मिमी, वेळापूर ६६.८ मिमी, पिलीव २२५.२ मिमी पाऊस झाला आहे.